Kirit Somaiya | जरंडेश्वर साखर कारखान्यातील शेतकऱ्यांना घेऊन किरीट सोमय्या ‘ईडी’ कार्यालयात. शेतकऱ्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. कारखान्याचा बेकायदेशीररित्या लिलाव करून घेण्यात आल्याचा आरोप

 

Kirit Somaiya ED
Kirit Somaiya | नाशिक आणि औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु झाले आहे

हायलाइट्स:

  • ईडी अधिकारी, शेतकरी आणि किरीट सोमय्या यांच्यात काय चर्चा होते, ते पाहावे लागेल
  • ईडीचे अधिकारी जरंडेश्वर कारखान्याबाबत शेतकऱ्यांकडून कोणती नवी माहिती घेतात का, हे पाहावे लागेल
मुंबई: आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी जमवलेल्या पैशांचा कथित अपहार केल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेत आलेले भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiaya0 यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीने प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतले आहे. किरीट सोमय्या हे गुरुवारी सकाळी जरंडेश्वर साखर कारखान्यातील सभासद शेतकऱ्यांना घेऊन मुंबईतील सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) कार्यालयात पोहोचले. जरंडेश्वर साखर कारखाना हा आता २७ हजार भागधारक शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी यावेळी किरीट सोमय्या यांनी केली. किरीट सोमय्या काही वेळापूर्वीच या शेतकऱ्यांना घेऊन ईडीच्या कार्यालयाच्या आतमध्ये गेले आहेत. आता याठिकाणी ईडी अधिकारी, शेतकरी आणि किरीट सोमय्या यांच्यात काय चर्चा होते, ते पाहावे लागेल. ईडीचे अधिकारी जरंडेश्वर कारखान्याबाबत शेतकऱ्यांकडून कोणती नवी माहिती घेतात का, हे पाहावे लागेल. यानंतर जरंडेश्वर कारखान्याबाबत ईडीकडून आणखी कोणती नवी कारवाई केली जाणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
गुन्हा दाखल होताच सोमय्या आक्रमक; जरंडेश्वर कारखान्याबाबत दिला ‘हा’ इशारा
तर दुसऱ्या बाजूला नाशिक आणि औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु झाले आहे. किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत युद्धनौका भंगारात जाण्यापासून वाचवण्याच्या मोहीमेखाली पैसे जमा केले होते. हे पैसे नंतर किरीट सोमय्या यांनी हडप केले, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणात किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी शिवसेनेकडून आंदोलन सुरु झाले आहे.
किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर फसवणुकीचा गुन्हा; माजी सैनिकांनी दाखल केली तक्रार
गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा सामना सातत्याने रंगताना दिसत आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप आणि कारवाईचे इशारे दिले जात आहेत. एका बाजूने कारवाई झाली की लगेच त्याला दुसऱ्या बाजूने नवा आरोप किंवा कारवाई करून प्रत्युत्तर दिले जाते, अशी मालिका सध्या पाहायला मिळत आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : bjp leader kirit somaiya goes into ed enforcement directorate office with farmers in mumbai
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here