नांदेड : पंजाबमधील करतारपूर येथील डॉ. गुरुविंदर सिंग सामरा यांनी सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वारा चरणी साडेचार कोटींचा रत्नजडित मुकुट ( कलगी ) आणि हार अर्पण केला आहे. रत्नजडीत सोन्याची २ किलो ८३४ ग्रॅम वजनाचा मुकुट त्यांनी २०२१ मध्ये गुरुद्वारा चरणी भेट केला होता. त्यावेळी मुकुट अडीच किलो वजनाचा असल्याचे सोनाराने सांगितले होते. पण त्याचे वजन कमी भरले. यामुळे सामरा यांना तो परत घ्यावा लागला. ही गोष्ट डॉ. सामरा यांच्या मनाला लागली. आता त्यांनी तो अर्पण केला आहे.
यापूर्वी डॉ. सामरा यांनी गुरू गोविंदसिंग यांचे जन्मस्थळ पाटणा साहब येथे सोन्याचा पाळणा भेट दिलाय. ह्या सर्व भेट वस्तू त्यांनी स्वतःच्या दवाखान्यातून आलेल्या उत्पन्नातून खरेदी केल्या. त्यांच्या या भेटीचे गुरुद्वारा बोर्डाने स्वागत केलं आहे.

नांदेडच्या गुरुद्वाऱ्यास तब्बल साडेचार कोटींचा रत्नजडीत मुकुट अन् हार अर्पण
नांदेडच्या इतिहासात असं कधी घडलं नाही, अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य