नवी दिल्ली : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी स्वदेशी संरक्षण उपकरणांची तिसरी यादी जाहीर केली. याचसोबत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत‘च्या कल्पनेच्या दिशेनं संरक्षण मंत्रालयानं टाकलेलं हे आणखी एक पाऊल आहे. ( The Third Positive Indigenisation List of Defence Equipment )

XE Variant: करोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत मोठी बातमी; केंद्राने ‘तो’ दावाच फेटाळला!

संरक्षण उपकरणांच्या स्वदेशीकरणाची सकारात्मक यादी जाहीर करताना आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. या यादीत १०१ हत्यारं आणि उपकरणांचा समावेश आहे. ही उपकरणं आणि हत्यारं यापुढे परदेशांतून आयात न करता केवळ स्वदेशी उत्पादकांकडूनच खरेदी केली जाणार आहेत. यामागे, भारताला संरक्षण उत्पादन केंद्र बनवण्याचा उद्देश असल्याचंही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं.

यापूर्वी, २१ ऑगस्ट २०२० रोजी स्वदेशी १०१ हत्यार-उपकरणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर ३१ मे २०२१ रोजी १०८ हत्यारं आणि उपकरणांसहीत दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. आज जाहीर करण्यात आलेल्या तिसऱ्या यादीत १०१ हत्यारांचा समावेश आहे. त्यामुळे, एव्हाना यापुढे आयात न केल्या जाणाऱ्या हत्यारांच्या यादीत तब्बल ३०० हून अधिक हत्यारांची भर पडलीय. ही हत्यारं आंतरराष्ट्रीय दर्जाची असतील, असंही म्हटलं गेलंय.

फुकटेगिरीमुळे राज्यांची श्रीलंका होईल!; PM मोदींसमक्षच ‘ते’ अधिकारी बोलले

१०१ हत्यारं-उपकरणांची तिसरी यादी

तिसऱ्या यादीत शस्त्रास्त्र, नौदलाच्या उपयोगाची हेलिकॉप्टर आणि जहाजविरोधी तसंच रेडिएशनविरोधी क्षेपणास्त्रांसह अनेक महत्त्वाच्या प्रणालींचा समावेश आहे. जहाजं आणि पानबुड्यांसाठी इंटरकॉम सिस्टम, अत्याधुनिक ऑफशोअर पॅट्रोल जहाजं, नेव्हल अॅन्टी ड्रोन सिस्टम, मोबाईल ऑटोनॉमस लॉन्चर (ब्राम्होस), हवेतून जमिनीवर मारा करणारं ६८mm रॉकेट, ड्रोनला रोखू शकणारी यंत्रणा यांचाही या यादीत समावेश आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या यादीच्या अधिसूचनेनंतर सशस्त्र दलानं तब्बल ५३,८३९ कोटी रुपयांच्या ३१ प्रकल्पांच्या करारांवर स्वाक्षरी केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तर १,७७,२५८ कोटी रुपये किंमतीच्या तब्बल ८३ प्रकल्पांच्या आवश्यकतेला होकार (Acceptance of Necessity) देण्यात आलाय. याशिवाय, २,९३,७४१ कोटी रुपयांची प्रकरणे पुढील पाच-सात वर्षांत प्रगतीपथावर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Qutub Minar: मोदी सरकार कुतूब मिनारमधील दोन गणेशमूर्ती हलवण्याच्या तयारीत, जाणून घ्या कारण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here