Mohit Kamboj | घरातील अनधिकृत बांधकाम प्रकरणात मुंबई महानगरपालिकेने मोहित कंबोज यांना नुकतीच नोटीस बजावली होती. या प्रकरणात लवकरच मोहित कंबोज यांच्यावर कारवाई होऊ शकते.

 

Sanjay Raut Mohit Kamboj (1)
Mohit Kamboj |संजय राऊत यांनी माझ्याकडे ५० लाख रुपये मागितले होते. मी त्यांना २५ लाख रुपये देऊ केले.

हायलाइट्स:

  • संजय राऊत यांनी माझ्याकडे ५० लाख रुपये मागितले
  • हे पैसे ते व्याजासकट परत करणार होते
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मला दैनिक ‘सामना’च्या कार्यालयात बोलावून मला धमकावले होते. त्यावेळी संजय राऊत यांनी माझ्याकडून २५ लाख रुपयेही उकळले होते, असा खळबळजनक दावा मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) हे मला हे पैसे व्याजासकट परत देणार होते. मात्र, आजपर्यंत त्यांनी हे पैसे परत दिलेले नाहीत. मी संजय राऊत यांना धनादेशाद्वारे संजय राऊत यांना २५ लाख दिले होते. या धनादेशाचे तपशील आणि इतर पुरावे द्यायला मी तयार आहे. याआधारे मुंबई पोलीस संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करायला तयार आहेत का, असा सवाल मोहित कंबोज यांनी विचारला.

मोहित कंबोज यांनी गुरुवारी एक व्हीडिओ ट्विट करून यासंदर्भात भाष्य केले. यामध्ये मोहित कंबोज यांनी म्हटले आहे की, २०१४ साली संजय राऊत यांनी मला ‘सामना’च्या कार्यालयात बोलावून धमकावले. त्यावेळी संजय राऊत यांनी माझ्याकडून २५ लाख रुपये घेतले. हे पैसे संजय राऊत मला व्याजासकट परत करणार होते. पण आजपर्यंत त्यांनी हे पैसे परत केलेले नाहीत.
मोठी बातमी: राज ठाकरेंकडून वसंत मोरेंची उचलबांगडी; पुणे शहराध्यक्षपदी साईनाथ बाबर
तुम्ही संजय राऊत आणि माझं सीसीटीव्ही फुटेज चेक करू शकता. तुम्हाला सगळं मिळेल. संजय राऊत यांनी मला ‘सामना’च्या कार्यालयात बोलावलं तेव्हा तिकडे आणखी तीन लोक होते. या तिन्ही बड्या व्यक्ती आहेत. हे तिघेही या प्रकरणात साक्षीदार व्हायला तयार आहेत. संजय राऊत यांनी माझ्याकडे ५० लाख रुपये मागितले होते. मी त्यांना २५ लाख रुपये देऊ केले. हे पैसे ते व्याजासकट परत करणार होते. मात्र, त्यांनी मला कोणतेही पैसे परत दिले नाहीत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा. आयएनएस विक्रांत प्रकरणात पोलिसांनी ऐकीव माहितीच्याआधारे किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल केला. मग आता माझीही तक्रार पोलीस दाखल करुन घेणार का नाही, याचे उत्तर आयुक्त संजय पांडे यांनी द्यावे, असे कंबोज यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : sanjay raut intimidate me in samana office and taken 25 lakhs from me says sanjay raut
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here