Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केले होते. यावेळी अजितदादांना एका पत्रकाराने राज्याच्या आर्थिक स्थितीविषयी प्रश्न विचारला.

हायलाइट्स:
- महाराष्ट्राची आर्थिक अवस्था श्रीलंकेसारखी होईल का
- महाराष्ट्राच्या डोक्यावरही कर्जाचा बोझा आहे
महाराष्ट्राची आर्थिक अवस्था श्रीलंकेसारखी होईल का, हा प्रश्न ऐकता क्षणीच अजितदादा म्हणाले की, अरेरेरेरेरेरे…. तुम्ही जरा माझ्याबरोबर चला. मी आपल्या वित्त सचिवांशी तुमची भेट घालून देतो, ते तुम्हाला सगळी माहिती देतील. मी पहिलेच सांगितलं आहे की, कोरोना काळात केंद्र सरकारने सर्व राज्यांना ४ टक्क्यांपर्यंत कर्ज काढण्याची मुभा दिली होती. पण महाराष्ट्र सरकार त्या मर्यादेपर्यंत पोहोचले नाही. एवढंच काय केंद्र सरकारनेही ६.५ टक्क्यांपर्यंत कर्ज घेतले. मला त्याविषयी फार बोलायचे नाही. पण आम्ही ३ टक्क्यांवरच थांबलो, एवढ्याच पैशातून आम्ही सरकार चालवले, असे सांगत अजित पवार यांनी महाराष्ट्राची बाजू लावून धरली. श्रीलंकेतील परिस्थितीसाठी तेथील राज्यकर्ते जबाबदार आहेत. जेव्हा कोणत्याही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होते, लोक रस्त्यावर उतरतात याचा अर्थ तेथील सरकार त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरले असा होता, असेही अजित पवार यांनी म्हटले.
कोरोनाच्या काळात राज्याचं उत्पन्न घटलं. यामध्ये सरकाराच दोष नाही. या काळात आपण उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचा प्रयत्न केला. २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्याला अंदाजित उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न मिळाले. त्यानंतर काहीजण महाराष्ट्राच्या उत्पन्नात १४ टक्के घट झाली, असे म्हणत आहेत. पण अर्थसंकल्पातील बाबी या अंदाजित असतात, ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
महत्तवाचा लेखसंजय राऊत यांनी ‘सामना’च्या कार्यालयात मला धमकावून २५ लाख रुपये घेतले होते: मोहित कंबोज
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : ajit pawar reaction on maharashtra government having loan burdern is situation like sri lanka economic crisis arises
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network