नवी दिल्ली : करोनाच्या चौथ्या लाटेमुळे चीन, युरोपसह जगातील अनेक देश हैराण झाले आहेत. त्यातच ओमिक्रॉनचा ‘XE’ हा नवा व्हेरिएंट आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातही ‘XE’ व्हेरिएंटने बाधित रुग्ण आढळल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या विषाणूच्या महाराष्ट्रातील प्रादुर्भावाचे वृत्त फेटाळले आहे. असं असली तरी हा व्हेरिएंट आगामी काळात देशासाठी धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Coronavirus New Variant News)

ओमिक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 हे दोन व्हेरिएंट एकत्र येऊन ‘XE’ व्हेरिएंटची निर्मिती झाल्याचं सांगण्यात येत आहे. या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण १९ जानेवारी रोजी ब्रिटनमध्ये आढळला होता. XE व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या १० पट वेगाने पसरू करू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भारतात या व्हेरिएंटचा शिरकाव झाल्यास करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका आहे.

“वसंतभाऊ मला म्हणाला होतात, तू राजकीय आत्महत्या केली, आता पक्षाने तुमची हत्या केली की!”

काय आहे ‘XE’ व्हेरिएंटची लक्षणे?

करोनाच्या या नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांना ताप, घसा दुखणे, खोकला, सर्दी, त्वचेची आग होणे, पोटाचे विकार अशी लक्षणे दिसू शकतात, असं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. जगभरात या विषाणूचे आतापर्यंत ६०० रुग्ण आढळले आहेत. या विषाणूच्या संसर्गाचं प्रमाण अद्याप कमी असलं तरी भविष्यात प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे.

राज ठाकरेंच्या दणक्यानंतरही वसंत मोरे म्हणाले, ‘झुकेगा नहीं, भूमिका बदलणार नाही!’

भारतात काय आहे करोना संसर्गाची स्थिती?

भारतातील कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या सध्या ११ हजार ६३९ इतकी आहे. सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण सध्या ०.०३ टक्के इतकं असून रोगमुक्ती दर ९८.७६ टक्के इतका आहे. गेल्या २४ तासांत १ हजार २२२ रुग्ण करोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून ४,२४,९८,७८९ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत १ हजार ३३ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here