पुणे : शहरातील माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी असे ५०हून अधिक भाजपजन कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी तिकडे तळ ठोकून आहेत. खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने आगामी महापालिका निवडणुकीत त्यांच्या नजरेत भरण्यासाठी अनेक जण या निमित्ताने प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे ‘तिकीट’ व्हाया कोल्हापूर मिळणार, अशा चर्चा पक्षाच्या वर्तुळात रंगल्या आहेत.

कोल्हापूर उत्तर विधासनभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या चिन्हावर जयश्री जाधव, तर भाजपच्या तिकिटावर सत्यजित कदम निवडणूक लढवत आहेत. ही लढाई वरवर महाविकास आघाडीविरोधात भाजप अशी वाटत असली, तरी गेल्या काही दिवसांतील प्रचारावरून ती पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातच असल्याचे चित्र उमटले आहे. पाटील या निवडणुकीच्या प्रचारार्थ कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. पाटलांच्या मदतीसाठी पुण्यातील माजी नगरसेवकांसह संघटनेतील ५०हून अधिक पदाधिकारी सध्या कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळी समीकरणे लक्षात घेऊन या पुण्यातील स्थानिक नेत्यांना कोल्हापुरातील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यासाठी भाजपमधील एक विशेष यंत्रणा काम पाहते आहे.

राज्यावर वीज दरवाढीचे संकट; येत्या दोन महिन्यात वीज दरवाढीच्या निर्णयाची दाट शक्यता
माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी सभागृह नेते धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, शहर उपाध्यक्ष श्रीपाद ढेकणे यांच्यासह ५०हून अधिक भाजपजणांनी कोल्हापुरला भेट दिली आहे. यातील काही जण अद्यापही तेथेच तळ ठोकून आहेत तर काही पुण्यात परतले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रविवारी कोल्हापुरात प्रचार सभा असल्याने पुण्यातील अनेक जण रविवारी पुन्हा कोल्हापुरात दाखल होणार असल्याची चर्चा आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुका येत्या सहा महिन्यांत होणार असल्याने चंद्रकांत पाटलांच्या नजरेत भरण्यासाठी अनेक जण प्रामाणिकपणे कोल्हापुरातील पोटनिवडणुकीत जोरदार प्रचार करत आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेच्या तिकिटाचा प्रवास हा कोल्हापुरच्या पोटनिवडणुकीतून जात असल्याची चर्चा रंगली आहे.

‘दादा परत या’चे फ्लेक्स

कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी पाटील तेथे तळ ठोकून आहेत. मूळचे कोल्हापूरचे असलेल्या पाटलांनी २०१९मध्ये ऐन वेळी पुण्यातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे बाहेरचा उमेदवार अशी त्यांच्यावर जोरदार टीकाही झडली होती. या पार्श्वभूमीवर कोथरूड परिसरात पाटील यांच्या विरोधकांनी ‘दादा परत या’ या आशयाचे फ्लेक्स लावून त्यांच्यावर टीका केली आहे. ‘दादा, एक महिना झाला, तुमचा शोध कुठेच लागत नाही. आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तुम्ही जेथे कुठे असाल, तिथून परत या. आम्ही तुमची वाट पाहतोय- समस्त कोथरूडकर’, अशा आशयाचे फ्लेक्स कोथरूड परिसरात लावण्यात आले आहेत.

मोठी बातमी! खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर सहा वर्षांसाठी अपात्रतेची कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here