धुळे : शहरातील प्रभाग क्रमांक ११ विश्वकर्मा नगर भागातील गटारी मोठ्या प्रमाणात तुंबून घाण पाणी नागरिकांच्या घरांमध्ये तसेच मंदिरांमध्ये शिरत असल्यामुळे तेथील नागरिक त्रस्त आहेत. तसेच या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्वभवला आहे. या संदर्भात वारंवार धुळे महानगरपालिका प्रशासनाला माहिती देण्यात आली, परंतु त्यांनी अक्षरश: दुर्लक्ष केल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.

धुळे महानगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी परिसरातील नागरिकांच्या आरोग्य संदर्भात निवेदन देण्यात आले होते. परंतु, पालिका प्रशासनातर्फे फक्त वेळकाढूपणा करून खोटी आश्वासने यापूर्वी नागरिकांना देण्यात आली होती. परिसरातील गटारी, कचरा, पाणी प्रश्न जैसे थे, असल्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी तुंबलेल्या गटारीमधील घाण पाणी आणून थेट धुळे महापालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयसमोर टाकले.

येणाऱ्या एक महिन्यात धुळे महानगरपालिका प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेऊन गटारांचा प्रश्न सोडवण्यात न आल्यास पालिका आयुक्तांच्या कार्यालयास कुलूप ठोकून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संतप्त नागरिकांनी पालिका प्रशासनास दिला आहे. तसेच, “आमची प्रमुख मागणी आहे की, आमचा भाग ग्रामीण भागात जोडावा अन्यथा आम्हाला सुविधा द्याव्या. त्याचबरोबर महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी जर आमच्याकडून नळपट्टी किंवा घरपट्टी वसुल करण्यास आला तर त्याच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत”, असा थेट इशारा सामाजिक कार्यकर्ते मनोज काळेकर यांनी दिला आहे.
मोठी बातमी : मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर वसंत मोरेंना थेट उद्धव ठाकरेंकडून ऑफर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here