पुणे : पुणे शहर मनसेच्या शहराध्यक्षपदावरुन वसंत मोरे हकालपट्टी झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात खलबतं सुरू झाली आहेत. कारण वसंत मोरे यांना थेट शिवसेनेकडून ऑफर आल्याची राजकीय चर्चा आहे. खरंतर, राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांसदर्भात घेतलेल्या भूमिकेला ठामपणे विरोध दर्शविणारे मनसेचे नेते वसंत मोरे यांना मोठा धक्का देत राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली. आता त्यांच्याजागी साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या दोन – तीन दिवसांपासून वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा होती. त्यानंतर आता वसंत मोरे हे पक्ष बदलणार की मनसेतच राहणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीकडून खुली ऑफर आल्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच वसंत मोरे यांची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे.

पत्नीच्या सत्कार सोहळ्यात पतीचा मृत्यू, कुटुंबाने डोळ्यांदेखत पाहिला धक्कादायक शेवट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना फोन करून आपण शिवसेनेत येण्याबाबत विचार करावा असं म्हंटल आहे. त्यामुळे पुण्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. यावर अद्याप वसंत मोरे यांनी कोणतीही भूमिका घेतली नसून ते भविष्यात शिवसेनेत जाणार का ? अशा चर्चा आता रंगल्या आहेत.

‘राजसाहेब माझ्या हृदयात’

‘माझी हकालपट्टी झालेली नाही. शेवटी पक्षात खांदेपालट होत असतात. माझ्यावरील कारवाईआधी मीच राज ठाकरेंना सांगितलं होतं की, मे नंतर मला शहराध्यक्षपदावर राहायचं नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. सरतेशेवटी पक्षाने निर्णय घेतला आहे. मी राजसाहेबांचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. राजसाहेबांनी घेतलेला निर्णय मान्य आहे. त्यांच्यासोबत गेली २७ वर्ष मी काम करतोय. साहेब माझ्या हृदयात असतील. सध्यातरी मनसे सोडण्याचा माझा विचार नाही’ असं वसंत मोरे यांनी कालच स्पष्ट केलं आहे. मात्र, थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यकडूनच ऑफर आल्यानंतर वसंत मोरे काय निर्णय घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

पुणे महापालिका निवडणुकीचं ‘तिकीट’ व्हाया कोल्हापूर, राजकीय वर्तुळात चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here