Kirit Somaiya INS Vikrant : आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेल्या निधीवरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपात नवीन दावे-प्रतिदावे होऊ लागले आहेत. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी आयएनएस विक्रांतसाठी केवळ 35 मिनिटंच निधी गोळा केला असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. त्यानंतर किरीट सोमय्या यांची सन 2013 मधील एक पोस्ट व्हायरल होऊ लागली आहे. त्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे. 

किरीट सोमय्या यांची फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये किरीट सोमय्या यांनी म्हटले की, डॉ. किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेतली. या भेटीत आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी त्यांनी राज्यपालांना विनंती केली. त्याशिवाय विक्रांत  शहीद स्मारक संग्रहालयासाठी 140 कोटी रुपये मुंबईकर जमवतील असेही सोमय्या यांनी त्यांना सांगितले. मजकूरासह पोस्ट व्हायरल होत आहे. 

 

फक्त 35 मिनिटं निधी जमा केला: सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, आयएनएस विक्रांतसाठी केवळ 35 मिनिटंच निधी गोळा केला. एवढ्या वेळात मी असे किती पैसे गोळा करु शकतो. 10 डिसेंबर 2013 रोजी प्रतिकात्मक कार्यक्रम केला होता फक्त. काँग्रेसनंही भिक मांगो आंदोलन केलं होतं. मग त्यांनी किती पैसे गोळा केले? असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. तसेच, मुंबई पोलीस ऐकीव माहितीवर एफआयआर कशी दाखल करू शकतात? एकही कागद नसताना त्यांनी एफआयआर कशी करून घेतली? असा सवालही किरीट सोमय्यांनी मुंबई पोलिसांना केला आहे.

संजय राऊतांचा निशाणा

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार निशाणा साधला. किरीट सोमय्यांनी नौटंकी बंद करावी. त्यांनी विक्रांतसाठी गोळा केलेल्या पैशाचा हिशोब द्यावा असेही राऊत यावेळी म्हणाले. पैसे गोळा झाले की नाही हा माझा साधा सवाल असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. तुम्ही देशाला आणि महाराष्ट्राला फसवत आहात. भाजपचे प्रमुख लोकं जर किरीट सोमय्यांचे समर्थन करत असतील तर कश्मीर फाईलप्रमाणे त्यांची सुद्धा विक्रांत फाईल तयार करावी लागेल असेही राऊत यावेळी म्हणाले. देशद्रोहाचे समर्थन करु नका असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here