पुणे : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वसंत मोरे (Vasant More) यांची पुणे शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी केल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून खळबळ उडाली. वसंत मोरे यांना पदावरून काढण्यात आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षातून त्यांना ऑफर देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेकडूनही वसंत मोरे यांना ऑफर देण्यात आली. याविषयी प्रश्न विचारले असता वसंत मोरे हे भावुक झाले.

खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच फोन करून वसंत मोरे यांना पक्षात येण्याची विचारणा केली. या सगळ्यावर आपण मनसे सोडणार का? असा प्रश्न विचारला असता माध्यमांशी बोलताना मोरे भावुक झाले. ते म्हणाले की, ‘मी मनसेतच आहे आणि मनसेतच राहणार. मी राज समर्थक आहे. पक्षासाठी काम करतो. मी पक्षाची साथ कधीच सोडली नाही’ असं वसंत मोरे यांनी ठामपणे सांगितलं.

मोठी बातमी : मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर वसंत मोरेंना थेट उद्धव ठाकरेंकडून ऑफर
यावेळी बोलताना त्यांचे डोळेही पाणावले होते. दरम्यान, ‘मी पक्षासाठी अनेक वर्ष काम केलं. मी राज समर्थक आहे. राज साहेब हेच पक्षाचे भवितव्य आहे. आमच्यासारख्या नेत्याचं काही नाही. एवढ्या वर्षांचे संबंध आहेत साहेबांनी कधीही साथ सोडली नाही.’ इतकंच नाहीतर यावेळी त्यांनी बोलताना राज ठाकरे यांनी दिलेला बॅचही दाखवला.

ते पुढे बोलताना म्हणाले की, ‘हा बॅच मला राज साहेबांनी दिला आहे. आजही तो माझ्याकडे आहे. मी अनेक वर्ष पक्षासोबत आहे. मला पक्षाचा झेंडाही माहिती नव्हता तेव्हा मी घरात तीन कापडांचा झेंडा शिवून लावला होता. मी मनसे कधीच सोडणार नाही’ अशा शब्दात भावुक होत वसंत मोरे यांनी आपल्या भावना मांडल्या.

Vasant More: राज ठाकरेंना कालच मेसेज केलाय, अजून रिप्लाय नाही; त्यांना भेटल्यानंतरच पुढचा निर्णय: वसंत मोरे
दरम्यान, आता राज ठाकरे यांच्यापर्यंत या भावना पोहोचणार का? ते वसंत मोरेंच्या मेसेजला उत्तर देणार का? हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. खरंतर वसंत मोरे यावेळी बोलताना म्हणाले की, ”कुठलीही बाबतीत बोलायचं असेल तर ते साहेबांना आधी मेसेज करतात आणि मग त्यांच्याशी बोलतात. याहीवेळी त्यांनी साहेबांना मेसेज केला आहे. पण अद्याप उत्तर आलेले नाही.’ त्यामुळे राज ठाकरे याबाबत काय निर्णय घेणार? ते वसंत मोरे यांना उत्तर देणार का? यावरही आता सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

‘राज ठाकरेंनी अद्यापही दिला नाही मेसेजला रिप्लाय’

खरंतर, पुण्यातील डॅशिंग नेते अशी वसंत मोरे यांची ओळख आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मला बऱ्याच पक्षांकडून ऑफर्स आल्या आहेत. मात्र, मी राज ठाकरे यांना भेटल्याशिवाय पुढचा कोणताही निर्णय घेणार नाही. राज ठाकरे यांना मी गुरुवारी रात्री मोबाईलवरून मेसेज पाठवला होता. त्यामध्ये मी राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. पण अजूनपर्यंत त्या मेसेजवर रिप्लाय आलेला नाही. आजपर्यंत मी मेसेज केल्यावर रिप्लाय आला नाही, असे कधीही झालेले नाही. कदाचित राजसाहेबांचा माझ्यावर थोडाफार राग असेल. मात्र, मी राजसाहेबांना भेटून त्यांच्यासमोर माझी भूमिका मांडणार आहे. मी मशिदींवरील भोंग्यांसदर्भात तसं को बोललो, हे मला त्यांना सांगायचे आहे, असे वसंत मोरे यांनी सांगितले.

‘विक्रांत आंदोलनाची सुरुवात बाळासाहेबांच्या आशीर्वादाने झाली, माझं पैसे जमवणं निव्वळ ‘सिम्बॉलिक’ होतं’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here