पुणे: आजघडीला दक्षिण पुण्यात वसंत मोरे या वैयक्तिक नावाभोवती प्रचंड वलय आहे. या भागात मला मानणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे माझी राजकीय हत्या वगैरे होणे शक्य नाही, असे वक्तव्य मनसेचे नेते वसंत मोरे यांनी केले. काही दिवसांपूर्वीच मनसेतून राष्ट्रवादीत गेलेल्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी वसंत मोरे (Vasant More) यांच्यासंदर्भात एक टिप्पणी केली होती. या टिप्पणीला प्रत्युत्तर देताना वसंत मोरे यांनी हे वक्तव्य केले.

वसंत मोरे आणि रुपाली पाटील यांचे विचार वेगवेगळे आहेत. गेल्या १५ वर्षांपासून मी नेतृत्त्व करतोय. मी सामान्य नागरिकांमधील कार्यकर्ता आहे. ज्या भागामधून मी निवडून येतो, तिथे वसंत मोरे या वैयक्तिक नावाभोवती एक वलय आहे. दक्षिण पुण्यातील लोक वसंत मोरेला मानतात. त्यामुळेच २०१७ च्या निवडणुकीत माझ्या प्रभागातील तीन वॉर्डांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले. एका वॉर्डात वसंत मोरेचा विजय झाला. मी या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मनसेचा बालेकिल्ला तयार केला आहे. त्यामुळे माझ्याबाबतीत राजकीय हत्या किंवा आत्महत्या शक्य नाही, असे वसंत मोरे यांनी सांगितले.
राज ठाकरेंच्या दणक्यानंतरही वसंत मोरे म्हणाले, ‘झुकेगा नहीं, भूमिका बदलणार नाही!’
रुपाली ठोंबरे-पाटील नेमंक काय म्हणाल्या?

राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी केली होती. त्यानंतर रुपाली ठोंबरे-पाटील यांनी एका जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली होती. मी मनसेतून राष्ट्रवादीत येताना तुम्ही म्हणाला होतात, तुझी राजकीय आत्महत्या असेल, पण वसंत भाऊ आता तुमची पक्षाने तर हत्या केली की…..!’ , असं म्हणत रुपाली पाटलांनी वसंत मोरे यांना डिवचलं. तसंच बहीण म्हणून तुमच्या पाठीमागे नेहमीच उभी असेल, असा आधारही दिला.

…म्हणून माझे कार्यकर्ते ‘हर्ट’ झालेत: वसंत मोरे

काल मला शहराध्यक्षपदावरून दूर केल्यानंतर माझे कार्यकर्ते दुखावले गेले होते. माझी हकालपट्टी झाली, हा शब्द त्यांना फार लागला. पण मला पक्षातून काढलेले नाही. एखाद्या पदावरून दूर झाले तर त्याला पायउतार झाले, असे म्हणतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here