कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आणखी तिघांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या तिघांसह कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील एकूण रुग्णांची संख्या ३८वर पोहोचली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
तिघांपैकी एक रुग्ण ३८ वर्षांचा असून, डोंबिवली पूर्वेकडील एका लग्न समारंभाला तो गेला होता. तर एका महिलेचाही समावेश आहे. ती टिटवाळा परिसरात राहते आणि एका सरकारी रुग्णालयात ती काम काम करते. तसंच कल्याण पूर्वेकडील ४० वर्षीय महिलेला करोनाची बाधा झाली आहे. तिच्या परिसरातील करोनाबाधिताच्या संपर्कात ती आल्याचं कळतं. या तिघांसह कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३८ झाली आहे. त्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य सात जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. अद्याप २९ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्यानं दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times