पुणे, पिंपरी-चिंचवड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीमध्ये तेलाचे तवंग दिसून आल्याने ऐन उन्हाळ्यात पाणीकपातीचे संकट पिंपरी-चिंचवडकरांच्या समोर उभे ठाकलं आहे. संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीमध्ये अचानक तेलाचे तवंग दिसून आल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणी पुरवठ्यावर संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये सुद्धा या विचित्र तवंगामुळे चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांमध्ये तेलाच्या तवंगामुळे पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. अचानक आलेल्या तेलाच्या तवंगामुळे पिंपरी-चिंचवडकरांच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पवना नदीवरील पावर जनरेटर मध्ये बिघाड झाल्यामुळे पवना नदीचा पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला होता. पावर जनरेटर ची दुरुस्ती करताना यामध्ये ऑईलचा वापर केला जातो आणि याच पावर जनरेटर ची दुरुस्ती करताना नदीमध्ये ऑइल सांडल्याने हे तेलाचे तवंग दिसून येत आहेत.

मुंबईत गृहमंत्र्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत खलबतं; पोलिसांना दिल्या महत्त्वाच्या सूचना
पवना नदी मध्ये अचानक दिसून आलेल्या तेलाच्या तवंगामुळे या सर्वांचा परिणाम पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठा वर होईल का याची माहिती घेण्यासाठी आम्ही पिंपरी-चिंचवड शहराचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांना आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, ते मीटिंगमध्ये असल्याने अद्याप काही माहिती देऊ शकलेले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here