मुंबई : एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावं, ही एसटी कर्मचाऱ्यांची मागणी राज्य सरकारने अमान्य केल्याने आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar News) यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी धडक दिली आहे. यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली. त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. (Msrtc Strike In Maharashtra)

आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र कर्मचाऱ्यांनी थेट ‘सिल्व्हर ओक’समोर ठिय्या मांडण्याची भूमिका घेतली. त्यामुळे एसटी कर्मचारी आणि पोलीस प्रशासनामध्ये संघर्षही झाला.

‘विक्रांत आंदोलनाची सुरुवात बाळासाहेबांच्या आशीर्वादाने झाली, माझं पैसे जमवणं निव्वळ ‘सिम्बॉलिक’ होतं’

दरम्यान, भाजपचे विविध नेते आणि वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या चिथावणीमुळेच एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आंदोलन केल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here