मुंबई: गेल्या पाच महिन्यांपासून आझाद मैदानात ठाण मांडून बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी धडक दिली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक आंदोलन करत शरद पवार (Silver Oak Sharad Pawar News) यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावं, ही एसटी कर्मचाऱ्यांची मागणी राज्य सरकारने अमान्य केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयानेही एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे संतापलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जोरदार घोषणाबाजी केली. (Msrtc Strike In Maharashtra)

आंदोलक प्रचंड आक्रमक झाले असताना खासदार सुप्रिया सुळे या अचानक घरातून बाहेर आल्या आणि आंदोलकांना सामोऱ्या गेल्या. मी तुमच्याशी बोलायला तयार आहे. शांततेच्या मार्गाने चर्चा करा, मी तुमचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार आहे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. मात्र, आंदोलक आक्रमक मनस्थितीत असल्याने ऐकायला तयार नव्हते.

एसटी कर्मचाऱ्यांची ‘सिल्व्हर ओक’वर धडक; शरद पवारांविरोधात घोषणाबाजी

आमच्यावर दगडफेक करून किंवा चपला फेकून प्रश्न सुटणार नाहीत. आंदोलकांनी शांततेने चर्चा करावी, मी या क्षणी तुमच्याशी बोलायला तयार आहे. माझे आई-वडील आणि मुलगी घरात आहे. प्रथम त्यांच्या सुरक्षिततेची मला खात्री करू द्या. यानंतर मी एसटी आंदोलकांशी चर्चा करायला तयार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

‘माझा गेलेला नवरा आणि मुलगा परत आणून द्याल का?’

सुप्रिया सुळे आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच एका महिलेने, ‘तुम्ही माझा गेलेला नवरा आणि मुलगा परत आणून द्याल का?’, असा प्रश्न त्यांना विचारला. कर्मचाऱ्यांबद्दल इतका कळवळा होता तर कर्मचाऱ्यांचे रक्त प्यायला नव्हते पाहिजे. तुम्ही सर्वसामान्यांची एसटी हडप करण्याच्या प्रयत्नात होतात. आम्ही या सरकारचा धिक्कार करतो, अशा शब्दांत एसटी कर्मचाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here