मुंबई : सिनेमातील्या लव्हस्टोरीही फिक्या पडतील इतक्या प्रेमकथा ऑफस्क्रीन घडत असतात. कुणाचं पॅचअप होतं तर कुणाचं ब्रेकअप. ही परंपरा अगदी सिनेमाचा पडदा उघडल्यापासून आजपर्यंत सुरूच आहे. बॉलिवूडमध्ये कधीही चवीने ज्या लव्हस्टोरीची चर्चा केली जाते ते कपल म्हणजे ऐश्वर्या राय आणि सलमान खान. ऑनस्क्रीन हम दिल दे चुके सनम असं म्हणत असताना खरोखरच या दोघांमध्ये दो जिस्म एक जान असं काहीसं झालं. पण ही लव्हस्टोरी अधुरी एक कहाणी ठरली ती एका प्रकरणामुळे.

एका रात्री सलमानने ऐश्वर्याच्या घरी जाऊन दंगा घातला आणि त्यानंतर ऐश्वर्याने सलमानने माझ्या थोबाडीत मारली असा आरोप करत हे नातं संपवलं. वीस वर्षापूर्वीच्या या ड्रामावर ना कधी सलमान बोलला ना ऐश्वर्या, पण आता एका मुलाखतीत सलमानने, ऐश्वर्याला मी थोबाडीत मारलेली झेपलीच नसती, असं म्हणत त्या घडल्या प्रकारावरून मौन सोडलं आहे.

Video : ‘शेर शिवराज’ सिनेमाच्या कलाकारांनी भवानी आईला घातलं साकडं

२० वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये आपल्या नावावर सिनेमा हिट करण्याची जादू सलमान आणि ऐश्वर्या यांच्यात होती. त्याकाळात या दोघांची लव्हस्टोरी चांगलीच चर्चेत होती. हम दिल दे चुके सनम या सिनेमाच्या शूटिंग वेळीच सलमान आणि ऐश्वर्या यांच्यात जवळीक वाढली. सिनेमा रिलीज झाला तेव्हा सल्लू आणि अ‍ॅश यांच्यातील नातं खूप पुढे गेलं होतं. पण नेमकी माशी शिंकली. ऐश्वर्यावर हक्क दाखवण्याच्या नादात सलमान तिच्यावर वॉच ठेवू लागला असा तिने नंतर आरोप केला. त्यातच एका रात्री सलमानने ऐश्वर्याच्या घरी दंगा घातला. जोरजोरात दार वाजवून तिला हैराण केलं. सलमानसाठी ती रात्र ऐश्वर्या आणि त्याच्या नात्यात दरी आणणारी ठरली.

ऐश्वर्या सलमान

याच प्रकरणावरून ऐश्वर्याने सलमानने मारहाण केल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर बॉलिवूडमधील या हिट जोडीच्या प्रेमाचा अध्याय संपला तो कायमचा. ऐश्वर्या त्यानंतर विवेक ओबेराॅयसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण नंतर हे नातंही फिस्कटलं आणि अ‍ॅश अभिषेक बच्चनशी लग्न करून सुखाने नांदू लागली.

Allu Arjun Birthday :अल्लू अर्जुनच्या लग्नाचा हा अनोखा किस्सा फारसा कोणाला माहितीच नाही

आता या प्रकरणावरची खपली निघाली ती एका मुलाखतीच्या निमित्ताने. सलमान खान याला या मुलाखतीत असं विचारण्यात आलं की त्याच्यावर ऐश्वर्याने मारहाण केल्याचा आरोप केला होता. मग खरंच सलमानने कधी कुणा महिलेला मारहाण केली आहे का? या प्रश्नावर सलमान त्याच्या नेहमीच्या शैलीत खुमासदार उत्तर देताना म्हणाला, माझ्यावरचा हा आरोप कधीच खरा नव्हता. इतकंच नव्हे तर त्या शोमध्ये समोरच्या टेबलावर बुक्की मारून सलमानने त्याची ताकदही दाखवली आणि म्हणाला, माझा एक ठोसा हा असा आहे, त्यामुळे ज्या महिलेने माझ्यावर थप्पड मारल्याचा आरोप केला ती थप्पड ऐश्वर्याला झेपलीच नसती. अर्थात सलमानने मौन सोडत केलेल्या या वक्तव्यावर मिसेस बच्चनने मात्र चिडीचूप राहणंच पसंत केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here