Kirit Somaiya: आयएनएस विक्रांतच्या नावाखाली ५८ कोटी रुपयांचा निधी गोळा करून तो हडपल्याचा किरीट सोमय्या व नील सोमय्या यांच्यावर आरोप असून याप्रकरणी चौकशीसाठी त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

हायलाइट्स:
- आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्यात पोलिसांची कारवाई.
- किरीट सोमय्या व नील सोमय्या यांना बजावले समन्स.
- ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात उद्या चौकशीला हजर व्हावे लागणार.
किरीट सोमय्या व नील सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत या युद्धनौकेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी गोळा करून त्याचा अपहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी माजी सैनिक बबन भोसले यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यात चौकशीसाठी सोमय्या पितापुत्रांना पोलिसांनी आज समन्स बजावले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : mumbai police summons former bjp mp kirit somaiya and his son bmc corporator niel somaiya
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network