MSRTC Strike | काही एसटी आंदोलकांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी धडक दिली होती. यानंतर वातावरण प्रचंड तापले होते.
हायलाइट्स:
- पोलिसांनी एसटी आंदोलकांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे
- शनिवारी पहाटे चार वाजता पोलिसांनी एसटी आंदोलकांना आझाद मैदानातून बाहेर काढायला सुरुवात केली
आझाद मैदानातून बाहेर काढल्यानंतर एसटी आंदोलनक आता जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकावर ठिय्या देऊन बसले आहेत. आमच्या सर्व सहकाऱ्यांना घेतल्याशिवाय आम्ही माघारी परतणार नाही, अशी भूमिका या एसटी आंदोलकांनी घेतली आहे. आझाद मैदानावर पहाटे करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान काही आंदोलकांना ताब्यातही घेण्यात आले आहे. तसेच काहीजणांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप एसटी आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी किती चिघळणार, हे पाहावे लागेल.
गुणरत्न सदावर्तेंना अटक
एसटी आंदोलकांच्या सिल्व्हर ओकवरील आक्रमक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली होती. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात कलम १२० ब आणि ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार यांच्यावरील हल्ल्यासाठी गुणरत्न सदावर्ते जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अटक केल्यानंतर शुक्रवारी रात्रीच सदावर्ते यांना जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणसीसाठी नेण्यात आले. आज सकाळी ११ वाजता पोलिसांकडून त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.
संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी आज मुंबईतील शरद पवारांच्या घरावर हल्लाबोल केला. बराच वेळ तिथे संतप्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. अखेर पोलिसांनी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं. सिल्व्हर ओकवर आंदोलन करणाऱ्या १०५ कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनाही आज न्यायालयात हजर केले जाईल.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : msrtc strike police drag out st employees from azad maidan mumbai st employees protest on csmt railway station
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network