अहमदनगर : ‘एसटी कर्मचाऱ्यांना गेली ४० वर्ष वेळोवेळी मदत केली आहे. आधार दिला, त्यामुळे खरा एसटी कर्मचारी पवार साहेबांच्या ( sharad pawar ) घरापर्यंत अश्या पद्धतीने जाणार नाही. हे मुद्दामून जाणीवपूर्वक केलेलं काम आहे. जे तिथे आले ते एसटी कर्मचारी (msrtc workers protest) होते का? ते कोणत्या परिस्थितीत होते हे सत्य बाहेर येईल’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil ) यांनी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी परिसंवाद कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
साताऱ्याचे उदयनराजे यांनी शरद पवार यांच्या घरावर जो हल्ला झाला त्यावर ‘जे केलं ते इथच फेडावं लागेल’ अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, उदयनराजे हे संध्याकाळी बोलले आहेत ते कोणत्या परिस्थितीत बोलले आहेत, हे तपासले पाहिजे आणि नंतर त्यावर मी बोलेन अस जयंत पाटील म्हणाले.