धुळे : राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र काही थांबताना दिसत नाही. आता खान्देशातील शिरपूर तालुक्यात गिधाडे गावातील तापी नदीपात्रात एका तरुण शेतकऱ्याने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केलं. काही वेळानंतर मृतदेह शोधण्यात नागरिकांना यश आलं. सदर आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव महेंद्र युवराज पाटील ३२ रा नेवाडे ता. शिंदखेडा जि. धुळे, असं आहे.

मयत महेंद्र पाटील याचे काका मोतीलाल लुका पाटील यांनी या संदर्भात शिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये माहिती देत नोंद केली आहे. त्यात म्हटलं आहे की, महेंद्र युवराज पाटील वय वर्ष ३२ हा त्याच्या आई सोबत नेवाडे येथे राहत होता. शेती व्यवसाय करुन त्यावर त्याच्या कुंटूंबाचा उदरनिर्वाह होता. मात्र, शेतात काही एक उत्पन्न येत नसल्यानं महेंद्र पाटील कर्जबाजारी झाला होता व महेंद्र पाटील कायम नैराश्यात राहत होता.

gunaratna sadavarte : माझ्या पतीच्या जीवाला शरद पवार, अजित पवार आणि वळसे-पाटलांकडून धोका – जयश्री पाटील
सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आईसाठी औषधी घेण्यासाठी जात असल्याचं सांगून गेला. त्यानंतर महेंद्र पाटील याने गिधाडे गावातली तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यांचा मृतदेह सायंकाळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. महेंद्र पाटील याचा मृतदेह शिंदखेडा रुग्णालयात दाखल केल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here