अहमदनगर: एसटी आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्लाबोल केल्यानंतर आता राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. या सगळ्यासाठी अॅड गुणरत्न सदावर्ते जबाबदार असल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली होती. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यापुढे जात या सगळ्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. सिल्व्हर ओकवरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर ते शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
gunaratna sadavarte : माझ्या पतीच्या जीवाला शरद पवार, अजित पवार आणि वळसे-पाटलांकडून धोका – जयश्री पाटील
यावेळी रोहित पवार यांनी गुणरत्न सदावर्ते आणि भाजपवर आगपाखड केली. सिल्व्हर ओक हे शरद पवार यांची खासगी मालमत्ता आहे. शरद पवार यांच्याकडे या सरकारमध्ये कोणतेही पद नाही. न्यायालयाने एसटी संपाबाबत निकाल दिल्यानंतर कर्मचारी माघारी परतायला तयार होते. पण त्यानंतर गुणरत्न सदावर्ते आझाद मैदानात गेले. यावेळी त्यांनी भाजपप्रेरित भाषण केले. ते भाजपची बाजू मांडत होते. लोकांना भडकावत होते. न्यायालयाच्या निकालानंतरही त्यांनी एसटी आंदोलकांना भडकवणारे भाषण केले. त्यानंतर सिल्व्हर ओकवर एसटी आंदोलकांनी धडक मारल्याची घटना घडली. हा सगळा घटनाक्रम पाहता या सगळ्यामगे गुणरत्न सदावर्ते यांचा हात तर आहेत. पण यामध्ये भाजपचा हात असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले.

गुणरत्न सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांची केस फुकट लढवत नव्हते. त्यासाठी सदावर्ते यांना कोट्यवधी रुपये मिळाले होते. यापूर्वी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना जेव्हा जेव्हा पगारवाढ मिळाली आहे, तेव्हा शरद पवार यांनी मध्यस्थी केली होती. फडणवीस सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार केवळ ४५० रुपयांनी वाढला. मग तेव्हा गुणरत्न सदावर्ते झोपले होते का, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला. एवढेच नव्हे तर भाजप सरकारच्या काळातही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. पण तेव्हा देवेंद्र फडणवीस त्या बैठकीलाही गेले नाहीत. त्यामुळे आपल्याला काहीच मिळणार नाही, हे ओळखून एसटी कर्मचाऱ्यांनी माघार घेतली. मात्र, महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला, असे रोहित पवार यांनी सांगितले.

एसटी संपाबाबत कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर सदावर्तें पुन्हा आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here