धुळे : शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना काल रात्रीच्या जेवणानंतर अचानक त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती बिघडत असल्याचं लक्षात येताच, ६८ जणांना तात्काळ रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मुलांवर उपचार सुरू झाल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे. कुणालाही काहीही अधिकचा त्रास नसल्याची माहिती पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी दिली.

नव्याने पोलीस दलात येणाऱ्या पोलीस विद्यार्थ्यांना धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या निवासासह जेवणाची सोयदेखील याच ठिकाणी करण्यात येते. दुपार आणि रात्रीचे जेवण त्यांना वेळेवर दिले जाते. काल रात्रीचे जेवणानंतर सुरुवातीचा काही वेळ कुणाला काही त्रास जाणवला नाही पण, क्षणार्धात एका पाठोपाठ एक याप्रमाणे जेवण केलेल्या ६८ प्रशिक्षणार्थींना मळमळ सुरू झाली आणि उलट्या होऊ लागल्या. ही बाब गांभीर्याने लक्षात घेत त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांना जेवणातून किंवा पाण्यातून ही विषबाधा झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, वेळीच उपचार मिळाल्याने सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

ST employees: तिकीट नसेल तर प्लॅटफॉर्मवरून निघा; एसटी आंदोलकांना सीएसएमटी स्टेशनवरून हटवलं
आज संध्याकाळच्या जेवणानंतर पोलीस प्रशिक्षण केंद्रातल्या काही विद्यार्थ्यांना अचानक उलट्या सुरू झाल्या. त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. एकूण ३० मुलांना अॅडमिट करुन त्यांना देखरेखीमध्ये ठेवण्यात आलं आहे. तरी आता सर्व बाबी आपण पडताळून पाहत आहोत, अशी माहिती देखील पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here