मुंबई: करोनावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरू असले तरी, करोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. मुंबईसह राज्यभरात आज ११७ रुग्णांची नोंद झाली आहे. एकट्या मुंबईत ७२ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ११३५ वर पोहोचली आहे.

राज्यात आज दिवसभरात ११७ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. ७२ जणांना करोनाची लागण झाली आहे. राज्यातील करोनाबाधितांचा आकडा आता ११३५वर पोहोचला आहे. तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं मृतांचा आकडा आता ७२ वर पोहोचला आहे.

मुंबईत आज दिवसभरात ७२ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. नवी मुंबईत १, बुलडाणा १, पुणे ३६, अकोला १, ठाणे ३, कल्याण-डोंबिवली १, पुणे ग्रामीण २ अशा एकूण ११७ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here