परभणी : तालुक्यातील एरंडेश्वर येथे ग्रामविकास अधिकारी यांची खोटी स्वाक्षरी करून गावठाण प्रमाणपत्र तयार करण्यात आलं असून ते गावकऱ्यांना देखील देण्यात आलं आहे. आणि ते प्रमाणपत्र रजिस्ट्रीसाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सर्व प्रकरणाबाबत लेखी तक्रार ग्रामविकास अधिकारी के. एन. भुसारे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

ग्रामविकास अधिकारी केयर भुसारी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, गावातील काही नागरिक त्यांच्याकडे गावठाण प्रमाणपत्राची मागणी करीत होते. मात्र, यापूर्वी काही गावठाण / वाढीव गावठाण मधील नागरिकांना हे प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. गावापासून दोन किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील जागेच्या गावठाण प्रमाणपत्राची काही नागरिक सतत मागणी करीत होते. परंतु हे प्रमाणपत्र देता येत नाही. अस संबंधिताना तोंडी सांगितलं व ते दिलं नाही. तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी तहसीलदार यांच्या निदर्शनास आणुन दिलं आहे की, काही दिवसांनी गावातील काही नागरिकांनी दोन किलोमीटर अंतरापेक्षा अधिक असलेल्या गट नंबर ९६ / ३ गणेश मधुकर संगेकर यांची जमीन परभणी आधारे रजिस्ट्री झाली. वसमत रोडवरील झिरो फाटा जवळील जमीनीचे प्रमाणपत्र असल्याचं सांगितलं.

Sanjay Raut: इतके दिवस गुळमुळीत आणि बुळचट राहिल्यानेच शरद पवारांच्या घरावर हल्ला: संजय राऊत
या प्रकरणाची खात्री करण्यासाठी भुसारे यांनी दिनांक ४ एप्रिलला दुय्यम निबंधक कार्यालय पूर्णा येथे या झालेल्या रजिस्ट्रीची नक्कल मिळण्यासाठी अर्ज देवून मागणी केली. त्यानुसार प्राप्त रजिस्ट्रीसोबत असलेल्या कागदपत्राची पडताळणी केली असता रजिस्ट्रीसोबत गावठाण प्रमाणपत्र जोडले असून या प्रमाणपत्रावरील स्वाक्षरी भुसारे यांची नाही व ती खोटी असल्याचं आढळून आलं आहे. संबंधित व्यक्तीने जागा विक्री करण्यासाठी गावठाण प्रमाणपत्राचे खोटे दस्तावेज तयार करुन प्रमाणपत्राचा उपयोग रजिस्ट्रीसाठी केला असून ही बाब गंभीर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here