Sanjay Raut | शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी आंदोलकांनी शुक्रवारी हल्लाबोल केला होता. त्याचे पडसाद सध्या राज्यभरात उमटत आहेत. संजय राऊत यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे.

 

Sanjay Raut TOI
Sanjay Raut | विरोधी पक्षातील काही लोक या हल्ल्याचे समर्थन करत आहेत. हा दळभद्रीपणाचा कळस आहे.

हायलाइट्स:

  • गुणरत्न सदावर्ते हा देखील भाजपनेच नवनिर्माण केलेला नेता आहे
  • गरळ ओकण्यासाठीच भाजपकडून सदावर्ते यांना पैसा दिला जातो
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे गृहखात्यावर निशाणा साधला आहे. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) गेल्या सहा महिन्यांपासून बोलत होते. कायद्याने कठोर होणे गरजेचे असते. इतका संयम आणि सहिष्णूता बाळगणे योग्य नाही. एवढे गुळमुळीत, बुळबुळीत आणि बुळचट सत्ताकारण चालत नाही. त्याचे परिणाम आपण काल भोगले आहेत, असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.
सगळ्यांना अडीच वाजताच मेसेज आले अन् पोलिसांना पत्ताच नव्हता, हे खूप मोठं फेल्युअर: फडणवीस
संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपवर टीकेची तोफ डागली. कालचा प्रसंग हा एक कारस्थान होते. काल जे काही घडलं ते आंदोलन नव्हे तर हल्ला होता. विरोधी पक्षातील काही लोक या हल्ल्याचे समर्थन करत आहेत. हा दळभद्रीपणाचा कळस आहे. मात्र, अशाप्रकारे सरकारला अडचणीत आणणे शक्य नाही. यामुळे विरोधकांचीच बेअब्रू होत आहे. गुणरत्न सदावर्ते हा देखील भाजपनेच नवनिर्माण केलेला नेता आहे. त्यांना भाजपचे आर्थिक पाठबळ आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर गरळ ओकण्यासाठीच भाजपकडून सदावर्ते यांना पैसा दिला जातो. सिल्व्हर ओकवरील कालचा हल्लाही त्याचाच एक भाग होता, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

दत्ता सामंतांसारखी माझी हत्या करण्याचा कट सरकार करत आहे | गुणरत्न सदावर्ते

एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हटवल्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) जाऊन बसले. या सर्व आंदोलकांकडे एकाचवेळी प्लॅटफॉर्म तिकीटं कशी आली? त्यांना कोणती यंत्रणा पोसत आहे, मदत करत आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. आमचा कामगारांना पाठिंबा आहे. पण कामगारांच्या एका गटाला भडकावून महाविकास आघाडी सरकार आणि महाराष्ट्राविरुद्ध गरळ ओकण्याचे काम सुरु आहे. याच्यामुळे विरोधी पक्षाला आपण फार मोठी तिरंदाजी करत आहोत, असे वाटत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shivsena leader sanjay raut on msrtc st employees attack at sharad pawar home in mumbai
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here