kirit Somaiya | किरीट सोमय्या व नील सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत या युद्धनौकेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी गोळा करून त्याचा अपहार केल्याचा आरोप आहे.

 

Sanjay Raut Kirit Somaiya
Sanjay Raut | तुम्ही एरवी इतरांना जाब विचारता मग आता तुम्हीही उत्तर द्या, असे संजय राऊत यांनी म्हटले.

हायलाइट्स:

  • ‘कर नाही त्याला डर कशाला’, असे भाजपचे नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांना ऐकून दाखवतात
  • मग किरीट सोमय्या यांनीही जाऊन पोलिसांना उत्तर द्यावीत
मुंबई: आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात पोलिसांनी समन्स पाठवल्यानंतर किरीट सोमय्या हे भूमिगत झाले आहेत, फरार झाले आहेत, अशी माहिती माझ्यापर्यंत पोहोचल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. एवढेच नव्हे तर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सध्या न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीनंतर ट्रॉम्बे पोलिसांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या दोघांना शनिवारी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, सोमय्या पितापुत्रांनी पूर्वनियोजित कार्यक्रमांचे कारण देत आज चौकशीला येणे टाळले आहे. (Mumbai Police Summons Former Bjp Mp Kirit Somaiya And His Son Neil Somaiya)

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या यांच्यावर आगपाखड केली. माझ्या माहितीनुसार, किरीट सोमय्या हे फरार झाले आहेत. ते अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयातही गेले आहेत. ‘कर नाही त्याला डर कशाला’, असे भाजपचे नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांना ऐकून दाखवतात. मग किरीट सोमय्या यांनीही जाऊन पोलिसांना उत्तर द्यावीत. तुम्ही एरवी इतरांना जाब विचारता मग आता तुम्हीही उत्तर द्या, असे संजय राऊत यांनी म्हटले. आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात माझ्याकडे जितकी माहिती होती, ती पोलिसांना दिली आहे. आता मी या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
‘विक्रांत आंदोलनाची सुरुवात बाळासाहेबांच्या आशीर्वादाने झाली, माझं पैसे जमवणं निव्वळ ‘सिम्बॉलिक’ होतं’
गुणरत्न सदावर्तेंना भाजपची आर्थिक रसद

गुणरत्न सदावर्ते यांना भाजपकडून आर्थिक रसद पुरवली जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गरळ ओकण्यासाठीच भाजप सदावर्ते यांना पैसे देते, असे राऊत यांनी म्हटले. तसेच राऊतांनी सध्या मुंबईत ठाण मांडून बसलेल्या एसटी आंदोलकांबाबतही शंका उपस्थित केली. एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हटवल्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) जाऊन बसले. या सर्व आंदोलकांकडे एकाचवेळी प्लॅटफॉर्म तिकीटं कशी आली? त्यांना कोणती यंत्रणा पोसत आहे, मदत करत आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. आमचा कामगारांना पाठिंबा आहे. पण कामगारांच्या एका गटाला भडकावून महाविकास आघाडी सरकार आणि महाराष्ट्राविरुद्ध गरळ ओकण्याचे काम सुरु आहे. याच्यामुळे विरोधी पक्षाला आपण फार मोठी तिरंदाजी करत आहोत, असे वाटत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shivsena leader sanjay raut slams bjp kirit somaiya over ins vikrant fund case
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here