: येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात भरती असलेल्या आठ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी सात जण इतर राज्यांतील असून, एक जण यवतमाळ जिल्ह्यातील आहे.

परराज्यांतील सात करोनाबाधितांपैकी चार उत्तर प्रदेशचे, दोन पश्चिम बंगालचे, तर एक दिल्लीचा आहे. हे सातही जण तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. तर पॉझिटिव्ह असलेला आठवा रुग्ण हा या सात जणांच्या संपर्कात आला होता.

विलगीकरण कक्षात सद्यस्थितीत एकूण ६५ जण भरती आहेत. यापैकी ५१ जणांचे अहवाल महाविद्यालयाला प्राप्त झाले. १४ जणांचे अहवाल अद्याप प्राप्त व्हायचे आहेत. प्राप्त झालेल्या अहवालांपैकी ४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकाच्या घराशेजारील भाग कंटेन्मेंट (प्रतिबंधित) करण्यात येणार आहे. तसेच त्यांचे कुटंबीय, ते ज्यांच्या संपर्कात आले असतील असे नातेवाईक व इतर संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांना सुध्दा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात होम क्वारंटाइनमध्ये असलेल्या नागरिकांची संख्या ८९ आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here