मुंबई: बॉलिवूडचे अनेक कलाकार आहे जे महागड्या ब्रॅंडच्या कपड्यांना प्राधान्य देतात. रणवीर सिंग, करण जोहर यांच्या लाखोंच्या कपड्यांची अनेकदा चर्चा झाली, पण सध्या अभिनेत्री राणी मुखर्जी देखील तिच्या महाग कपड्यामुळं चर्चेत आलीए.


राणी नुकतीच मुंबईत एका ठिकणी दिसली होती. यावेळी राणीचा अगदी कॅज्युअल लुक होता. पांढऱ्या टॉपसोबत तिनं तपकिरी रंगाची पॅंन्ट घातली होती. तिच्या या लुकची इतकी चर्चा झाली की, या पॅंन्टची किंमत ऐकूण नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावला.

राणी वर्षातून एखादा चित्रपट करत असली तरी ती कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. त्यामुळं ती Gucci सारख्या ब्रॅंडच्या कपड्यांमध्ये दिसून येते. राणीनं घातलेल्या या पॅन्टची किंमती काही हजारांमध्ये नाही तर लाखांमध्ये आहे. या पॅन्टची किंमत १,२०,००० हजार असल्याचं म्हटलं जात आहे.
एखाद्याच सिनेमात दिसणारी राणी मुखर्जी आहे कोट्यवधी रुपयांची मालकीण, जाणून घ्या तिची संपत्ती

राणीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या फार कमी चित्रपटांमध्ये काम करत आहे. तिनं शेवटचा ‘बंटी और बबली २’ केला होता. या चित्रपटात तिने सैफ अली खान सोबत काम केलं आहे. आता राणी ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वेजियन’ चित्रपटात दिसणार आहे. ती तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी खूप मानधन घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राणी मुखर्जीची एकूण संपत्ती १२ दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे ९० कोटी रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here