पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाविरोधात भूमिका घेतली, आणि त्या भोंग्याचा आवाजाच्या दुपटीने हनुमान चालीसा लावावी असे आदेश मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले त्यानंतर राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर मनसेचे तत्कालीन शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेच्या अगदी विरोधी भूमिका घेतली. “माझ्या प्रभागात मी अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचे भोंगे लावणार नाही.” अशी थेट भूमिका घेतल्यामुळे वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. वसंत मोरे यांनी आपल्या प्रभागात ३ हजार ८०० मतदार मुस्लिम असल्याने लोकप्रतिनिधी म्हणून आपली अडचण होत असल्याचं म्हटलं होत.

त्यानंतर वसंत मोरेंच्या याच विधानाचा धागा पकडत आज पुण्यातील कात्रज तलाव जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून हिंदू महासंघाने वसंत मोरे यांचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला आहे. ‘हे’ ५६ हजार लोक काम पाहून मतदान करतात. ‘ते’ ४ हजार मात्र धर्म पाहून आणि एवढ्या मोठया स्टेटमेंट नंतर सुद्धा सर्वच राजकीय पक्ष आमंत्रण देतात. आत्ताच जागे झालो नाही तर सर्वच लोकप्रतिनिधी असेच वागतील ५६ हजार गृहीत धरले जातील. त्यामुळे कात्रज तलाव जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून हिंदू महासंघाने वसंत मोरे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं आहे.

शरद पवारांच्या दौर्‍याने अमरावतीत हायअलर्ट, ४ जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलिस बळ तैनात
हिंदू महासंघाचे आंदोलन

‘माझ्या प्रभागातील ४ हजार लोकांच्या भावना दुखावल्या जातील म्हणून मी माझ्या प्रभागातील ५६ हजार लोकांच्या भावनेचा विचार करणार नाही अशी मानसिकता सध्या पुण्यात दिसत आहे. या महाराष्ट्रातील प्रत्यक जण जर प्रभागातील ४ हजार लोकांचा विचार करत असेल तर मग ५६ हजार लोकांचा विचार कोणी करायचा? त्या ५६ हजार लोकांना जागृत करण्याचं काम आम्ही करत आहोत’. असं यावेळी हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी म्हंटल आहे. तर , या देशातील, राज्यातील आणि पुण्यातील हिंदूंना कोणी गृहीत धरत असेल तर हिंदू महासंघ त्यांना उत्तर देईल, असं देखील यावेळी दवे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here