कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा जोरदार सामना सुरू आहे. भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसंच ही पोटनिवडणूक जिंकत राज्यातील भाजपचा १०७ वा आमदार निवडून येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. (Devendra Fadanvis On Maharashtra Government)

‘कोल्हापूरमधील जनतेच्या मनात राज्य सरकारविरोधात मोठा आक्रोश आहे. कोल्हापूरकरांसाठी एकही चांगलं काम या सरकारने केलेलं नाही. महापुरात मागील सरकारने जशी मदत केली, तशी आता पुन्हा केली जावी अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र या सरकारने पूरग्रस्तांना काहीही मदत केली नाही. याचा परिणाम पोटनिवडणुकीच्या निकालात दिसून येईल,’ अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

शरद पवारांच्या दौर्‍याने अमरावतीत हायअलर्ट, ४ जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलिस बळ तैनात

‘शिवसेनेनंही लांगुलचालन सुरू केलं’

शिवसेना ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर छद्म धर्मनिरपेक्ष झाली आहे. जेव्हा शिवसेनेच्याच एका पदाधिकाऱ्याकडून हिंदुह्रयद बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आला, तेव्हाच शिवसेना हिंदुत्ववादापासून दूर गेली आहे, हे स्पष्ट झालं, असा हल्लाबोल करत फडणवीस यांनी शिवसेनेला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ला आणि एसटी आंदोलन

‘भाजपची भूमिका ही सुरुवातीपासूनच एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूची राहिली आहे. मात्र सरकारने आडमुठी भूमिका घेत या कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करणं टाळल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. मात्र शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला चुकीचा असून भाजप या घटनेचा निषेध करतो,’ अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here