sinnar crime news: महाराष्ट्र हादरला! पोलिस कर्मचाऱ्याच्या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू; सासू, पत्नी गंभीर जखमी – nashik police officer carried out a deadly attack on his own family
नाशिक : नाशकातील सिन्नर तालुक्यातील दोडी दापुर येथील एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या घरगुती वादातून सासरे, सासू व पत्नी यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, उपचारादरम्यान सासऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खबळळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सूरज देविदास उगलमुगले (मनमाड पोलीस ठाण्यात दंगा नियंत्रण विभाग) उपनगर याने दोडी दापूर येथील त्यांचे सासरे निवृत्ती दामोदर सांगळे (५८), सासू शिला निवृत्ती सांगळे(५२), पत्नी पुजा सुरेश उगलमुगले यांच्यावर भांडणावरुन दोन दिवसांपुर्वी मारहाण करत तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. नाशिकरोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निवृत्ती सांगळे यांचा मृत्यू झाला असून, शिला सांगळे व पूजा उगलमुगले हे गंभीर आहेत. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला भाजपकडून ५ लाख; फडणवीस यांची कोल्हापूरात घोषणा नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी सुरज उगलमुगले फरार आहे. यापूर्वी, पत्नीने शहर हद्दीत असलेल्या उपनगर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार दिली होती. मात्र, त्यावर पोलीस निरीक्षक निलेश माईणकर यांनी कारवाई न केल्याने त्यांना सह आरोपी करावी अशी मयताच्या नातेवाईकांची मागणी आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.