राजस्थानने अश्विनला निवृत्त का केले, जाणून घ्या…राजस्थानची ४ बाद ६७ अशी अवस्था असताना अश्विन फलंदाजीला आला. त्यानंतर अश्विनने हेटमायरबरोबर दमदार फलंदाजी करत राजस्थानचा डाव सावरला. पण त्यानंतर मात्र राजस्थानने त्यालाच निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. अश्विनने यावेळी २३ चेंडूंत २८ धावांची खेळी साकारली.
अश्विनला का केले निवृत्त, जाणून घ्या…अश्विनने राजस्थानच्या संघाला सावरले खरे, पण त्याच्याकडून मोठे फटकेबाजी पाहायला मिळत नव्हती. त्यामुळे अखेरच्या षटकांमध्ये धावा जमवण्यासाठी राजस्थानने त्याला निवृत्त करण्याचा निर्णय घेतला असवा. अश्विनच्या जागी रायम परागला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले आणि परागने एका षटकारासह ४ चेंडूंत आठ धावा केल्या.
आजच्या पहिल्या सामन्या दिल्ली कॅपिटल्सने केकेआरला पराभूत केेल. पण त्यामुळे गुणतालिकेत मोठा बदल झाला नाही. कारण या पराभवानंतरही केकेआरचा संघ हा ६ गुणांसह अव्वल स्थानावर राहिला. केकेआॉरने सामान गमावला असला तरी त्यांचा रनरेट चांगला होता, त्यामुळे त्यांना हा सामना गमवावा लागला नाही. दुसरीकडे मात्र लखनौ सुपर जायंट्स आणइ राजस्थान रॉयल्स यांच्यातील एक संघ नक्कीच अव्वल स्थानावर जाणार असल्याचे स्पष्ट दिसत होते. कारण हा सामना सुरु होण्यापूर्वी लखनौचा संघ हा सहा गुणांसह चौथ्या स्थानावर होता. त्यामुळे हा सामना जिंकून त्यांचे आठ गुण होतील आणि ते सहजपणे पहिल्या स्थानावर विराजमान होतील, कारण आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्याही संघाला आठ गुण कमावता आलेले नाहीत. त्यामुळे लखनौसाठी आजचा विजय अव्वल स्थानावर घेऊन जाऊ शकतो. दुसरीकडे राजस्थानचा संघ हा गुणतालिकेत सामन्यापूर्वी ४ गुणांसह पाचव्या स्थानावर होता. पण त्यांचा रनरेट हा चांगला आहे. त्यामुळे हा सामना जिंकल्यावर त्यांचे ६ गुण होऊ शकतात आणि ते थेट अव्वल स्थानावर पोहोचू शकतात. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.