Vasant More | राज ठाकरे आणि वसंत मोरे यांच्या आजच्या भेटीवर पुण्यातील बरीच समीकरणे अवलंबून आहेत. राज ठाकरे हे आज वसंत मोरे यांच्याबाबत काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

हायलाइट्स:
- राजसाहेब ठाकरे हे विचारांचा अथांग सागर आहेत
- माझ्या सर्व शंका-कुशंकांचे निरसन होईल
यावेळी प्रसारमाध्यमांनी, राज ठाकरे यांच्यासोबतच्या आजच्या बैठकीत तोडगा निघाला नाहीतर काय कराल?, असा प्रश्न वसंत मोरे यांना विचारला. यावर वसंत मोरे यांनी म्हटले की, राजसाहेब ठाकरे हे विचारांचा अथांग सागर आहेत. त्यामुळे माझ्या सर्व शंका-कुशंकांचे निरसन होईल, याची मला खात्री असल्याचा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला. आज पुण्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते माझ्यासोबत येण्यासाठी आग्रही होते. मात्र, मी ‘शिवतीर्थ’वर एकटाच जाईन, असे त्यांना सांगितले. तरीही काहीजण हट्टाने माझ्यासोबत येत आहेत. आता या अडचणीतून राजसाहेब काहीतरी मार्ग काढतील, असे वसंत मोरे यांनी म्हटले.
माझा राज ठाकरे किंवा मनसेवर कोणताही राग नाही. मी माझी अडचण राजसाहेबांना बोलून दाखवेन. फक्त माझाच प्रभाग नाही तर हडपसर परिसराचा विचार केला तर बऱ्याच अडचणी येऊ शकतात. मी माझी अडचण राज ठाकरे यांना बोलून दाखवेन. मी एक लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका मांडली होती. मी पक्षातून बाहेर गेलेलोच नाही. त्यामुळे राज ठाकरे माझी मनधरणी करतील, असा प्रश्नच येत नाही. थोडीफार नाराजी आहे. पण शहरातील काही पदाधिकाऱ्यांमुळे पक्षात अनेक वाद होत आहेत. या सगळ्या गोष्टी संधी मिळाल्यास मी राज ठाकरे यांच्या कानावर घालेन. मला खात्री आहे की, माझे समाधान होईल. मी काहीच ठरवेलेले नाही. मी पक्ष सोडण्याचा कोणताही विचारही केलेला नाही, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : vasant more will meet raj thackeray on shivtirth mumbai
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network