परभणी : वैयक्तिक मान्यता देऊन तत्कालीन प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी केलेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी शिक्षण उपसंचालकांनी बीडचे निरंतर शिक्षणाधिकारी विक्रम सारुक यांना आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्याचे परभणीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याने चौकशीकडे संपूर्ण शिक्षण विभागाचे लक्ष लागलं आहे.

परभणीचे तत्कालीन प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा सध्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून वैयक्तिक मान्यता दिल्याची तक्रार गंगाखेडचे काँग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, महालिंग भिसे यांनी शिक्षण आयुक्तांकडे केली होती. यावेळी त्यांनी अनेक पुरावे सादर केले असल्याची माहिती आहे . तक्रारीची दखल घेऊन शिक्षण आयुक्त यांनी शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी केलेल्या वैयक्तिक मान्यतेबाबत अनियमितेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांना दिल्या आहेत.

Vasant More: राज ठाकरेंच्या भेटीत समाधान झालं नाही तर?, वसंत मोरे पुण्यातून निघताना म्हणाले….
कोण करणार चौकशी ?

त्यानुसार, शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांनी वैयक्तिक मान्यतेमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी बीडचे निरंतर शिक्षणाधिकारी विक्रम सारुक यांना सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे परभणीचे सध्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांचा पाय चांगलाच खोलात गेला असल्याचं दिसत आहे.

समक्ष चौकशी करा…

शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी वैयक्तिक मान्यतेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे चौकशीदरम्यान आपले म्हणणे मांडण्यासाठी समक्ष चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदार गोविंद यादव यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. मात्र, लेखी म्हणणे सादर करावे असं सांगितलं जात असल्याचं समजत आहे.

पाकिस्तानच्या रस्त्यांवर ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा; नेमकं काय घडलं?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here