अहमदनगर : टँकर गैरव्यवहार प्रकरणी राळेगणसिद्धीत उपोषणाचा इशारा देण्यात आल्यानंतर प्रशासनाने तेथे जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. मात्र, तरीही दक्षता म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी झालेल्या आक्रमक आंदोलच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राळेगणसिद्धीमध्ये जास्तच सावधगिरी बाळगल्याचे दिसून येते.
हजारे यांना झेड सुरक्षा व्यवस्था आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्यात येत आहे. आंदोलक उपोषण करण्यावर ठाम असल्याने रात्रीपासूनच पोलिस सावध आहे. गावात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हजारे गावातच असून त्यांचे प्रशिक्षण केंद्रात नित्याचे काम आणि भेटीगाठी सुरू असल्याचे सांगण्यात आले. तेथेही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इशारा दिलेले कार्यकर्ते अद्यापपर्यंत राळेगणसिद्धीत आले नव्हते.