मुंबई: आयपीएल आणि ग्लॅमर यांचे तगडे कनेक्शन आहे. सामना पाहण्यासाठी क्रिकेटपटूच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड्स तसेच बॉलीवूड स्टार नेहमीच येतात. गेल्या काही वर्षात मिस्ट्री गर्लची संख्या वाढत चालली आहे. सामना सुरू असताना कॅमेरामॅन अशा सुंदर मुलींना दाखवण्याची संधी सोडत नाहीत. अशा या मिस्ट्री गर्लचा शोध चाहते सोशल मीडियावर घेत असतात. रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या लढतीत अशीच एक सुंदर मुलीचे सर्व दिवाने झाले.
केकेआर आणि दिल्ली यांच्यातील लढतीत कॅमेरामॅनने अनेक वेळा एका सुंदर मुलीवर फोकस केला. या मुलीच्या एक्सप्रेशन वारंवार कॅमेऱ्यात कैद होत होत्या. जेव्हा ऋषभ पंतने आंद्रे रसेलचा कॅच सोडला तेव्हा दिल्लीची ही चाहती निराश दिसली.
वाचा- शार्दुल षटकार मारत होता आणि कोच अंपायरशी भिडला, पाहा…
आयपीएलच्या सामन्यामुळे चर्चेत आलेल्या या सुंदर मुलीला सोशल मीडियावर चाहत्यांनी शोधून काढले.
काही तासात या मिस्ट्री गर्लचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. या मुलीचे नाव आरती बेदी असून तिने इंस्टाग्रामच्या बायोवर एक्टर असे लिहले आहे. आरतीने स्टेडियममधील काही फोटो देखील स्टोरी म्हणून शेअर केले आहेत. आरतीच्या इंस्टाग्रामवर अनेक ग्लॅमरल फोटो अपलोड केलेत.