Exclusive: Sher Shivraj- समोर आला अफजल खान, बॉलिवूड स्टारची मराठीत एण्ट्री
युट्यूबर निकुंज लोटिया यानं रणबीर आणि आलिया यांच्या लग्नावर स्फूप व्हिडिओ त्याच्या चॅनेलवर आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये त्यानं शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ सिनेमातील एक दृश्य मजेशीरपणे रिक्रिएट केलं आहे. त्यामध्ये तो रणबीर-आलियाच्या लग्नानंतर त्यांच्या गाडीमध्ये धावताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आलियाला कॉमेन्ट करण्यावाचून राहवलंच नाही.
हा व्हिडिओ सुरू झाल्यानंतर तू मेरी है मेरी ही रहेगी हे गाणं सुरू होतं. व्हिडिओमध्ये ही युनिक आलिया वेड्स रणबीर असं लिहिलेल्या गाडीच्या मागं अनवाणी धावताना दिसत आहे. त्यानं पांढरा कुर्ता-पायजमा घातलेला दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यानं लिहिलं आहे की, ‘१७ एप्रिल रोजी माझी अशीच अवस्था असेल…’ हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आलियानं कॉमेन्टमध्ये ‘Dead’ असं लिहिलं आहे. त्याबरोबर आलियानं हसण्याचा इमोजीही शेअर केला आहे.

आता आलियाची ही कॉमेन्ट पाहून युझर्स वेगवेगळे तर्क लावू लागले आहेत. काहींच्या मते आलियानं ही कॉमेन्ट करत तिच्या लग्नाच्या वृत्ताला एक प्रकारे दुजोरा दिला आहे.