मुंबई : सर्वसाधारणपणे कलाकाराचा मुलगा कलाकार होतो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो तसंच राजकीय नेत्याची पुढची पिढी ही देखील अनेकदा राजकारणातच सक्रिय असते. अर्थात याला काही अपवाद आहेत. त्यातला एक अपवाद म्हणजे विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुख. रितेशनं अभिनयाच्या क्षेत्रामध्ये चांगलंच यश मिळवलं आहे. रितेशच्या पाठोपाठ आणखी एका राजकीय नेत्याचा मुलगा राजकारण सोडून अभिनयात त्याचं नशीब आजमावणार आहे. हा मुलगा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर.

आजवर इतिहासात ज्यांनी जगावेगळं ठरत प्रेमाला आपलसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो वा रोमिओ ज्युलिएट! निखळ प्रेमासोबत जर मैत्रीही जोपासली तर आयुष्य अगदी खुलून जातं, मात्र समाजातल्या काही अघोरी कृत्यांमुळे काहींना आपलं प्रेम गमवावं लागतं. अशाच काहीशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात उत्तम समतोल साधत अभिनेता सोहम चाकणकर चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘तू आणि मी, मी आणि तू’ या चित्रपटातून रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. सोहम या चित्रपटात विशेष भूमिकेत आहे.

आलियाच्या या सवयींचं करायचं काय? लग्नानंतर रणबीरला होणार प्रॉब्लेम

सोहम चाकणकर

सोहम करत असलेल्या ‘तू आणि मी, मी आणि तू’ या चित्रपटाची कथा रोमँटिक आहे. यामध्ये सोहम गणेश नावाच्या समंजस, साध्या आणि होतकरू मुलाची भूमिका साकारणार आहे. शिवाय सोहमचा रोमँटिक अंदाजही या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोहमसोबत या चित्रपटात आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

चित्रपटसृष्टीतील पदार्पणाबद्दल सोहमनं सांगितलं की, “अभिनय क्षेत्रात येण्याची संधी मला आमच्या चित्रपटाचे निर्माते सागर जैन यांनी दिली, आणि दिग्दर्शक कपिल सरांनी मला दिलेलं प्रोत्साहन यासाठी सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. शूटिंगला आल्यानंतर मला आमच्या टीमनं खूप सपोर्ट केला ज्यामुळे मला एकदाही मी या क्षेत्रात नवीन आहे याची जाणीव झाली नाही. मला कपिल सरांनी घेतलेल्या वर्कशॉपमधून आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनांमधून बरंच काही नव्यानं शिकता आलं आणि माझा अभिनयाबाबतीतचा रस वाढत गेला, ‘तू आणि मी, मी आणि तू’ चित्रपटाची कथा रोमँटिक आणि फ्रेश असल्याने काम करायला मज्जा आली. या क्षेत्रात मला बरीच उंची गाठायची आहे आणि त्यासाठी मी खूप मेहनत घेणार आहे.”

सोहम चाकणकर

सोहमच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणाबाबत रूपाली चाकणकर यांनी सांगितलं की, “सर्वप्रथम मी असं सांगेन की सोहमला मिळालेल्या या संधीमागे पूर्णतः त्याचं श्रेय आहे, माझा यात काहीच वाटा नाही. उलट त्याचा हा निर्णय ऐकून मी आश्चर्यचकित झाले, माझ्यासाठी खरंच अत्यंत आनंदाची बातमी आहे, आमच्या कुटुंबात कोणी अद्याप या क्षेत्रात नाही. सोहम वेगळं क्षेत्र निवडून त्यात कामगिरी करत आहे. हे पाहून खूप आनंद होत आहे. आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सोहमच्या मागे कायम आहेतच, आणि नक्कीच आशा आहे की, त्याने निवडलेल्या या क्षेत्रात तो त्याचं नाव कमावेल.”

PHOTOS: ब्रेकअप आणि बाइक…ईशान खट्टर चर्चेत

या चित्रपटाची निर्मिती ही राजू तोडसाम, ऋषभ कोठारी व सागर जैन यांनी केली आहे. कपिल जोंधळे यांनी ‘तू आणि मी, मी आणि तू’चं दिग्दर्शक केलं आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here