निर्मात, दिग्दर्शक सुभाष घई यांनी याबद्दल नुकतंच सांगितलं. ते म्हणाले की या लग्नाबद्दल ऋषी कपूर यांच्याशी त्यांचं बोलणं झालं होतं. ऋषी कपूर यांना आलिया रणबीरचं लग्न डिसेंबर २०२० मध्ये व्हावं अशी इच्छा होती. पण त्याआधी ३० एप्रिल २०२० रोजी ऋषी कपूर हे जग सोडून गेले.
सलमान खानच्या प्रश्नाला ‘KGF Chapter 2’च्या Yash चं सणसणीत उत्तर

बाॅम्बे टाइम्सशी बोलताना सुभाष घई म्हणाले, ‘ मी ऋषी कपूर यांच्या घरी त्यांना WWI Maestro पुरस्कार स्वीकारण्यासाठी निमंत्रित करायला गेलो होतो. आम्ही त्यावेळी खूप गप्पा मारल्या. तेव्हा ते म्हणाले की रणबीर आलियाच्या लग्नाचं प्लॅनिंग ते करत आहेत. डिसेंबर २०२० मध्येच हे लग्न जोरदार करायचा विचार आहे. पण त्याआधीच काही महिने म्हणजे एप्रिलमध्ये ऋषी कपूर हे जग सोडून गेले.’
सुभाष घई पुढे म्हणाले, ‘ आता ऋषी कपूर यांची इच्छा पूर्ण होत आहे. मी रणबीर आणि आलियाला खूप शुभेच्छा देतो. त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखकारक आणि आनंदी जाऊ दे.’
आलिया भट्टचे काका राॅबिन भट्ट यांनी दोघांच्या लग्नाची तारीख सांगितली आहे. १४ एप्रिलला रणबीर-आलिया विवाहबंधनात अडकणार आहेत. मेहंदी सोहळा १३ एप्रिल रोजी होईल. लग्न आर के हाऊसमध्ये होणार आहे.
आयुष्यातल्या क्षणांना खोटे रंग नको, कुशल बद्रिकेची पोस्ट Viral

लग्नाला साधारणपणे ४५० जण असणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळं मर्यादित लोकांनाच बोलावणार आहेत. पुन्हा कपूर खानदानही मोठं असल्यानं पाहुण्याची यादी थोडी कमी असेल. यात शाहरुख खान, करण जोहर, संजय लीला भंसाळी, झोया अख्तर यांना आमंत्रण आहेच. शिवाय वरुण धवन आणि त्याचा भाऊ रोहित धवन, अयान मुखर्जी, डिझायनर मसाबा गुप्ता, अर्जुन कपूर, आकांक्षा रंजन, अनुष्का रंजन, मनीष मल्होत्रा यांनाही आमंत्रण मिळालं आहे.
रणबीर-आलिया २०१७ पासून डेटिंग करत आहेत. त्या दोघांचा एकत्र सिनेमा ब्रह्मास्त्र सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे.