पुणे : गुणरत्न सदावर्ते याला अटक केल्यानंतर अनेक घडामोडींना वेग आला आहे. त्यातच पोलिसांनी असा दावा केला आहे की, गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून विलीनीकरण करून देतो असं सांगून पैसे गोळा केले आहेत. याबाबत आता एसटी कर्मचाऱ्यांनी समोर येऊन बोलण्यास सुरुवात केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या दाव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

याबाबत स्वारगेट डेपोतील एका कर्मचाऱ्याने माध्यमांशी बोलताना गुणरत्न सदावर्ते आणि अजय कुमार गुजर यांच्या संगमताने सगळं सुरु असल्याचा खुलासा केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी पैसे घेतले की नाही माहित नाही. मात्र, अजय कुमार गुजर यांनी आम्हा निलंबित कर्मचाऱ्यांकडे प्रत्येकी ५४० रुपयांची मागणी केली होती ते आम्ही दिले. आता ते पैसे वकिल साहेबांकडे गेले की नाही हे मला माहित नाही अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचारी संजय मुंडे यांनी दिली आहे.

Monsoon 2022 : आनंदाची बातमी; स्कायमेटने वर्तवला पावसाचा अंदाज, वाचा महाराष्ट्रात कसा असेल मान्सून
दरम्यान, ज्यावेळी मला वाटलं की विलीनीकरण होणार नाही. त्यावेळी मी स्वतः कामावर हजर झालो. मात्र, मी स्वतः गुजर यांच्याकडे पैसे दिले असल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले आहे. त्यांच्या या कबुलीमुळे आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

अजयकुमार बहादूरसिंग गुजर हे औरंगाबाद डेपो क्रमांक ०१ मध्ये प्रमुख कारागीर या पदावर कार्यरत असून ते कनिष्ट वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या संघटनेद्वारे एसटी महामंडळात बेकायदेशीर पद्धतीने संपाची नोटीस देऊन या संपाला सुरुवात झाली.

दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय ब्राह्मण असतात; सुजात आंबेडकरांचे वादग्रस्त विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here