मुंबई : बॉलिवूडमध्ये पॅचअप आणि ब्रेकअपचा खेळ काही नवा नाही. तू नही तो और सही हा या क्षेत्रातील अनेक कपल्सचा लाइफ फंडा आहे. एक्स बॉयफ्रेंड आणि एक्स गर्लफ्रेंड समोरासमोर आले तरी काहीच घडले नाही असं म्हणत पुढे जातात. अशा काही कपल्सच्या मनातील गोष्टींच्या खपल्या काढण्याचं काम रिअॅलिटी शो किंवा टॉक शोमधून केलं जातं. कॉफी वुइथ करण हा शो यासाठीच ओळखला जातो. दिग्दर्शक करण जोहरच्या शोमधील सोफ्यावर बसायला येणाऱ्या सेलिब्रिटींकडून असं काही बोललं जातं की त्याची चर्चा व्हायला वेळ लागत नाही.

काही वर्षापूर्वी या शोमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि सोनम कपूरची जोडी आली होती. तेव्हा रॅपिड फायर राउंडमध्ये दीपिकाला करणने विचारलं की एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरला काय गिफ्ट द्यायला आवडेल? तेव्हा ती म्हणाली की त्याला कंडोमचं पाकीट गिफ्ट द्यायला आवडेल. दीपिका पाहुणी म्हणून आलेल्या कॉफी वुइथ करण शोच्या एपिसोडमधील हा किस्सा सध्या तुफान व्हायरल होतोय. आलिया आणि रणबीरच्या बहुचर्चित लग्नाच्या तोंडावर दीपिकाच्या मनातील हे हॉट गिफ्ट पुन्हा चर्चेत आलं आहे.

Ranbir Alia चं लग्न रद्द? राहुल भट्टनं केलाय मोठा खुलासा

कॉफी वुइथ करण या शोमध्ये दीपिका असं म्हणाली, की कंडोमचा सर्वात जास्त वापर रणबीरकडून केला जातो. त्याला कंडोमचा वापर करायला खूप आवडतं. त्यामुळेच मला त्याला हीच गोष्ट भेट म्हणून द्यायला आवडेल. त्यावर शोचा होस्ट करणने दीपिकाला जेव्हा विचारलं की रणबीरला तिला कोणता सल्ला द्यावासा वाटतो, त्यावर दीपिकाचं उत्तर होतं की त्याने एखाद्या चांगल्या ब्रँडच्या कंडोमचा प्रचार करावा. कंडोमविषयी तो खूप छान माहिती देऊ शकेल. या सेगमेंटवर दीपिका आणि सोनम कपूर खूप हसल्या होत्या.

जेव्हा या शोमधील हा किस्सा उडत उडत रणबीर कपूरपर्यंत पोहोचला तेव्हा रणबीरने मात्र रागाचा पारा चढू न देता दीपिकाच्या म्हणण्याकडे सकारात्मक पाहिलं आणि म्हणाला, खरंच आहे, सध्याची वाढती लोकसंख्या पाहता कंडोमचीच गरज आहे. त्यामुळे दीपिकाच्या मनात असलेल्या गिफ्टचं आणि तिच्या विचाराचं मी स्वागत करतो. एकीकडे रणबीर या बाबतीत कूल असला तरी त्याचे वडील अभिनेते ऋषी कपूर मात्र चांगलेच भडकले होते. याच सेगमेंटमध्ये अभिनेत्री सोनम कपूरनेही मनातील एक गोष्ट ओठावर आणली होती. रणबीर खूप चांगला मित्र आहे पण तो चांगला बॉयफ्रेंड होऊ शकतो की नाही याबाबत मला खात्री नाही.

Ranbir Alia Wedding :’नांदा सौख्य भरे,लवकर आई-बाबाही व्हा!’ संजय दत्तनं दिला आशीर्वाद

दीपिका पदुकोण

बॉलिवूडमध्ये सतत अफेअर्समुळे चर्चेत राहणाऱ्यांपैकी एक म्हणजे रणबीर कपूर. सावरियाँ या सिनेमातील रणबीरची नायिका सोनम कपूर हिच्यासोबतही त्याने शूटच्यावेळी फर्ल्ट केल्याचं सोनमने सांगितलं होतं. कतरिनाशीही रणबीरची जवळीक झाली होती. दीपिका पदुकोणसोबत रणबीरचं नातं खूपच पुढे गेलं होतं हे काही लपून राहिलेलं नाही. अनेकदा रणबीर आणि दीपिकाला कार्यक्रमात हातात हात घालून फिरताना पाहिलं गेलं आहे. लाँग व्हेकेशन्ससाठी ही जोडी वेळ काढून जायची. पण त्यांच्यात बिनसलं आणि त्यांनी त्यांच्या वाटा वेगळ्या केल्या.

रणबीरसोबतच्या ब्रेकअपमधून कित्येक दिवस दीपिका बाहेर पडत नव्हती. तेव्हाच नेमका रणवीर सिंह दीपिकाच्या आयुष्यात आला आणि पुढे जाऊन दीपिकाने त्याच्याशी लग्न केलं. तर रणबीर कपूर त्याच्या सगळ्या एक्स गर्लफ्रेंडना विसरून आलियाशी संसार करण्यासाठी तयार झाला आहे. बॉलिवूडमधील सर्वात चर्चा झालेल्या रणबीर आणि दीपिकाच्या ब्रेकअपनंतर आता दोघांनीही आपापले जोडीदार निवडले आहेत.

दीपिका सोनम

रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू असताना काही वर्षापूर्वी करण जोहरच्या हॉट सोफ्यावर बसून, रणबीरला मला कंडोम पाकिट गिफ्ट द्यायचं आहे असं म्हणणाऱ्या दीपिकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा लाइक्सचा धुमाकूळ घालत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here