मुंबई : प्रत्येक कलाकार हा त्याचा एक काळ गाजवत असतोच. पण त्याचा काळ ओसरला की तो इतका मागे पडतो की जेव्हा अनेक वर्षांनी त्याचा चेहरा समोर येतो, तेव्हा हाच का तो कलाकार ज्याच्यासाठी चाहत्यांच्या उड्या पडायच्या. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते रांगा लावायचे. अभिनेत्रींच्या बाबतीत तर हे जास्त प्रमाणात होतं. लग्नानंतर त्यांचा फिटनेस जातो, सौंदर्याकडून लक्ष हटतं आणि मग हीच का ती सुपरहिट सिनेमाची नायिका असं म्हणण्याची वेळ येते.

असंच काहीसं झालं आहे बॉलिवूडमध्ये हॉट भूमिका केलेल्या अभिनेत्री शिल्पा शिरोडकर या अभिनेत्रीची. तीस वर्षापूर्वी सुपरहिट ठरलेल्या आँखे या कॉमेडी सिनेमात अभिनेता गोविंदासोबत झळकलेल्या शिल्पा शिरोडकरला आता ओळखणंही कठीण झालंय. नुकताच तिनं सध्याच्या लूकमधला एक फोटो इन्स्टावर शेअर केल्यामुळे तिचं हे बदललेलं रूप समोर आलं.

असाही किस्सा- जेव्हा दीपिका रणबीरला गिफ्ट म्हणून देणार होती कंडोमचं पॅकेट

1993 साली पडद्यावर आलेल्या आणि तुफान कॉमेडी करत हिट झालेल्या आँखे या सिनेमात शिल्पा शिरोडकरने केलेली चंद्रमुखी ही भूमिका खूपच गाजली. अभिनेता गोविंदा आणि चंकी पांडे यांच्या कॉमेडीमध्ये शिल्पाचा बोल्ड लूकही खूपच भाव खाऊन गेला. या सिनेमाला तीस वर्षे झाली. आता पुन्हा शिल्पा शिरोडकर हे नाव चर्चेत येण्याचं कारण म्हणजे नुकतेच शिल्पाने तिच्या इन्स्टा पेजवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिला ओळखणंही कठीण झालं आहे. वाढलेलं वजन आणि सौंदर्य कुठच्या कुठं गेल्याने शिल्पा शिरोडकर एकेकाळी सिनेमात हॉट भूमिका करायची हे तिच्या चाहत्यांना सारखं आठवावं लागत आहे.

नव्वदच्या दशकात शिल्पा लोकप्रियतेच्या शिखरावर होती. शिल्पाची आजी अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांनी १९३८ साली ब्रह्मचारी या सिनेमात बिकीनी घालून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. १९८९ साली भ्रष्टाचार या हिंदी सिनेमातून शिल्पाने अभिनयात पदार्पण केलं. ज्यामध्ये तिने अंध मुलीची भूमिका केली होती. किशन कन्हैय्या या सिनेमात शिल्पावर धबधब्यात खाली चित्रीत झालेलं गाणं तिच्या बोल्ड लूकमुळे चांगलंच गाजलं.

सोनू निगमनं दोन कारणांमुळे पाहिला नाही The Kashmir Files

शिल्पा शिरोडकर

तिने काही टीव्ही मालिकातही काम केलं. हम, दिल ही तो है, गोपीकिशन, मृत्युदंड या सिनेमातही शिल्पाच्या भूमिका होत्या. बहीण नम्रता शिरोडकर हिने जेव्हा सिनेमात पदार्पण केलं तेव्हा शिल्पा तिचा बॉयफ्रेंड अपरेश रणजित याच्यासोबत लग्न करून संसाराला लागली. सध्या ती पती व मुलीसह सिनेमा जगापासून लांब आहे. एकेकाळी बिनधास्त भूमिका करणारी, झीरो फिगर नायिकांमध्ये ओळखली जाणारी शिल्पा शिरोडकर हिचं बदललेलं रूप सोशल मीडियावर पाहून तिचे चाहतेही अवाक झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here