Raj Thackeray | राज ठाकरे यांची उत्तर सभा ठाण्यात पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी शरद पवार आणि संजय राऊत यांनाही लक्ष्य केले.

 

हायलाइट्स:

  • अजित पवार यांच्या घरी ईडीचा छापा पडतो
  • त्यांच्या सख्ख्या बहिणींच्या घरावरही धाड पडते
  • अजित पवारांच्या घरी धाड पडल्यानंतही शरद पवार हे नरेंद्र मोदी यांची भेट घेतात
ठाणे: शरद पवार हे खुश झाले की भीती वाटायला लागते. आज शरद पवार हे संजय राऊत यांच्यावर खुश आहेत. त्यामुळे आता संजय राऊत कधी टांगले जातील, हे कळणारही नाही, अशी खोचक टिप्पणी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली. ते मंगळवारी ठाण्यात मनसेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या उत्तर सभेत बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. (MNS cheif Raj Thackeray speech in Thane)
Raj Thackeray: मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ईदपर्यंतची मुदत देतो; राज ठाकरेंचा अल्टिमेटम
अजित पवार यांच्या घरी ईडीचा छापा पडतो. त्यांच्या सख्ख्या बहिणींच्या घरावरही धाड पडते. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या घरावर एकही धाड पडत नाही. ही गोष्ट मला समजतच नाही. अजित पवारांच्या घरी धाड पडल्यानंतही शरद पवार हे नरेंद्र मोदी यांची भेट घेतात. इतके सगळे झाल्यानंतरही शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध मधूर कसे राहतात? या सगळ्यामुळे मी आजपर्यंत कधीही शरद पवार यांना भडकलेले पाहिले नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
Raj Thackeray: राज ठाकरेंचा भाषणाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये सिक्सर; शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याबाबत खोचक भाष्य
यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचाही उल्लेख केला. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या भाषणात मी बोललो होतो की, पवार साहेब खुश झाले की, भीती वाटायला लागते. आज शरद पवार हे संजय राऊत यांच्यावर खुश आहेत. त्यामुळे संजय राऊत कधी टांगले जातील, हे कळणारही नाही, अशी टिप्पणी राज ठाकरे यांनी केली. शरद पवार यांच्या अशाच धोरणामुळे अनेक काँग्रेसवाले गेलेले आहेत. शरद पवार एखादी गोष्ट बोलतात, ती उशीराने समजते. तेव्हाते बोलले होते ते आज लागलंय, हे नंतर कळते, असेही राज यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : sanjay raut is sharad pawar’s favorite person soon he will be in problem says mns chief raj thackeray
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here