गेल्या महिन्यात दक्षिण दिल्लीतील निझामुद्दीनमध्ये तलबीघी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमातून करोनाचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण वाढले. या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या तबलीघींमुळे देशातील विविध भागांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला. यानंतर सोशल मीडियातून मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जातंय. यानंतर सरकारने हे पत्रक काढलंय.
संसर्गजन्य रोगामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन आरोग्य स्थितीत नागरिकांमध्ये भय आणि चिंता उत्पन्न होते. अशा परिस्थितीत काही नागरिक आणि एखाद्या समाजाविरोधात पूर्वग्रहदुषित विचार मांडल्याने समाजात फूट पडण्यास चालना मिळते. परिणामी आपसात वैर निर्माण होऊन अराजकता आणि समाजात तेढ निर्माण होते. यामुळे एखाद्या समाजाला लक्ष्य करून टीका करू नका, असं आवाहन केंद्रानं केलं आहे.
आपत्कालीन स्थितीत नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याबद्दलच्या सूचनाही सरकारने केल्या आहेत. आरोग्य, स्वच्छता आणि पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तण करू नये किंवा त्यांच्यावर हल्ले करू नये. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवरून जारी केलेल्या या पत्रकात म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times