औरंगाबाद : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. राज यांच्या या टीकेनंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनसुद्धा उत्तर दिले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी राज ठाकरेंना उत्तर देतांना, “लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पवार साहेब सक्षम आहेत, सरड्याला लाजवेल अशा दर सहा महिन्यांनी भूमिका बदलणाऱ्यांनी एवढंच लक्षात ठेवावं’, अशी टीका केली आहे. चव्हाण यांनी फेसबुकवर पोस्ट करत ही टीका केली आहे.

सतीश चव्हाण यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की, “देवाच्या आशीर्वादाने सूर्योदयापासून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पवार साहेब सक्षम आहेत. सरड्याला लाजवेल अशा दर सहा महिन्यांनी भूमिका बदलणाऱ्यांनी एवढंच लक्षात ठेवावं, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. तर याचवेळी त्यांनी आपल्या पोस्टमध्ये एक हिंदी शेरसुद्धा लिहला असून ज्यात, “कितना भी शोर करले..तू तो बस एक तोता है…मजबूरी से ही सही..तेरा ‘किसिसे’ समझोता हैं” असे म्हटलं आहे.

Raj Thackeray: राज ठाकरे यांचा आता भाजपलाही इशारा; ‘तशी वेळ आली तर…’
फोटोही केले पोस्ट….

शरद पवारांनी हात जोडलेला एखादाच दुर्मिळ फोटो तुम्हाला मिळू शकतो असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे त्यांना उत्तर देण्यासाठी सतीश चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये शरद पवारांचे मंदिरातील उपस्थितीत असलेले तीन फोटोसुध्दा पोस्ट केले आहेत. ज्यातील दोन फोटोमध्ये पवार हात जोडून उभे असल्याचे पाहायला मिळत आहे.


काय म्हणाले होते राज ठाकरे?

ठाण्यातील आपल्या भाषणात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “शरद पवार हे नास्तिक आहेत. त्यामुळे ते धर्माकडे बघताना ते त्याच दृष्टीने पाहतात. एखादाच दुर्मिळ फोटो तुम्हाला मिळू शकेल ज्यात शरद पवारांनी हात जोडलेले दिसतील. कदाचित तोही मिळणार नाही. शरद पवार हे धर्मबिर्म काही मानत नाहीत. देव वगैरे काही मानत नाहीत. त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात,” असे राज म्हणाले होते.

पुणेकरांसाठी खास ऑफर, आता फक्त १० रुपयांत फिरा पुणे आणि पिंपरी-चिंचवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here