पुणे : अवयवदाता आणि अवयवग्राही (अवयव घेणारा) यांच्या कागदपत्रांचे काळजीपूर्वक परीक्षण न केल्याचा ठपका ठेवून रुबी हॉल क्लिनिकच्या अवयव प्रत्यारोपण केंद्राची नोंदणी पुढील सहा महिने किंवा आरोग्य विभागाच्या समितीचा अंतिम अहवाल येईपर्यंत निलंबित करण्याचा आदेश मंगळवारी काढण्यात आला. मानवी प्रत्यारोपण कायद्याच्या कलमांचे उल्लंघन केल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आल्याने रुबी हॉल क्लिनिकवर ही कारवाई करण्यात आली आहे.

नेमक काय आहे प्रकरण ?

सारिका सुतार (वय ३८) या महिलेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने त्यांनी कर्जाची परतफेड करण्यासाठी स्वतःचे मूत्रपिंड (किडनी) अमित साळुंखे यांना देण्याचे कबूल केले. त्यासाठी साळुंखे आणि त्यांची पत्नी सुजाता यांनी सुतार यांना १५ लाख रुपये देण्याचे कबूल करूनही रक्कम दिली नाही. सुतार यांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया २४ मार्चला रुबी हॉल क्लिनिकमध्ये झाली. त्या वेळी गैरप्रकार घडल्याचे कोरेगाव पार्क पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर ‘रुबी’ला नोटीस बजावण्यात आली.

Raghunath Kuchik : रघुनाथ कुचिक यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेणार, पीडित तरुणीचा मोठा निर्णय
रुबी हॉस्पिटलने केलेला खुलासा कायद्याच्या कलम १३ (अ) अंतर्गत राज्य सल्लागार समितीपुढे ठेवण्यात आला. आरोग्य विभागाने चौकशीसाठी चार सदस्यांची समिती स्थापन केली. समितीने ससून रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन प्राथमिक अहवाल आरोग्य विभागाला दिला आहे. ‘रुबी’ने अवयवदाता आणि अवयवग्राही यांचे आधार कार्ड, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, वयाचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र या कागदपत्रांचे काळजीपूर्वक परीक्षण न केल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. अवयव प्रत्यारोपण कायद्याचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

‘ब्रेन डेड’ रुग्णांचे अवयव काढण्याची परवानगी कायम…

रुबी हॉल क्लिनिकचा अवयव प्रत्यारोपण परवाना निलंबित केल्याने पुढील आदेशापर्यंत या रुग्णालयात प्रत्यारोपण करता येणार नाही. मात्र, अवयवदानाचे महत्त्व व रुग्णांची गरज लक्षात घेऊन रुबी हॉल क्लिनिक यापुढील काळातही ‘नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रायव्हल सेंटर’ म्हणून कार्यरत राहील. म्हणजेच ब्रेनडेड रुग्णांचे अवयव प्रत्यारोपणासाठी काढण्याची मुभा त्यांना देण्यात आली आहे. परंतु रुग्णांचे अवयव प्रत्योरापण करण्याची जबाबदारी पुणे प्रादेशिक प्रत्यारोपण समिती तसेच मुंबईच्या ‘रोटो-सोटोट‘वर सोपविली आहे.

हार्बर रेल्वेची वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत; नंतर समोर आलं धक्कादायक कारण
आरोग्य विभागापुढे म्हणणे मांडण्याची संधी आम्हाला मिळालेली नाही. अवयवदाता आणि अवयव घेणाऱ्या रुग्णांमध्ये पैशांचा व्यवहार घडला असून, त्याच्याशी रुबी हॉल क्लिनिकचा संबंध नाही. आरोग्य विभागाचा आदेश आम्हाला अमान्य आहे. तो अन्यायकारक आहे. या आदेशाविरोधात आम्ही कायदेशीर सल्लामसलत करून पावले उचलू, असं रूबी हाॅल क्लिनिकच्या विधी सल्लागार मंजूषा कुलकर्णी यांनी सांगितलं.

वारंवार चार्जिंगची गरज नाही! २८ तासांच्या बॅटरी लाईफसह Oppo चे शानदार इयरबड्स भारतात लाँच, किंमत खूपच कमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here