नवी दिल्ली : करोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर देशभरातील निर्बंध शिथिल करण्यात आले आणि जनजीवन पुन्हा पूर्ववत झालं आहे. मात्र रेल्वे गाड्यांबाबतचा गोंधळ अजूनही कमी झाला नसल्याचं चित्र आहे. रेल्वेकडून आज पुन्हा तब्बल १४७ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच इतर १९ गाड्यांबद्दल अद्याप संभ्रम कायम असून या गाड्या वेळेवर चालणार की नाही, याबाबत अनिश्चिता आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून रेल्वेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (Train Cancellation News Today)

रेल्वे प्रशासनाकडून कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, याची माहिती देण्यासाटी NTES ही वेबसाइट तयार करण्यात आली आहे. अचानक रेल्वे गाड्या का रद्द करण्यात आल्या आहेत, यामागील कारणाचा खुलासा रेल्वेकडून अधिकृतरित्या करण्यात आलेला नाही. मात्र तांत्रिक कारणांमुळे रेल्वेने हा निर्णय घेतल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

महाविकास आघाडीतील बेबनाव पुन्हा उघड; काँग्रेसच्या मंत्र्यांची परब यांच्यावर टीका

कोणत्या रेल्वे गाड्या झाल्या रद्द?

भारतीय रेल्वेकडून रद्द करण्यात आलेल्या बहुतांश गाड्या या बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगाल, ओडिसा आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडण्याआधी रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांच्या यादीवर नजर टाकावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. रेल्वेने https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ या वेबसाइटवर रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची यादी दिली आहे.

दरम्यान, रेल्वेने सेवेतील त्रुटी दूर करून प्रवाशांचा मनस्ताप कमी करावा, अशी मागणी आता सर्वसामान्यांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here