परभणी : वीज बिलापासून सुटका मिळवण्यासाठी परभणीमध्ये एका महिलेने शक्कल लढवून मीटरमध्ये छेडछाड करत महावितरणला दोन लाखांचा चुना लावला आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगला परसकुमार जैन असं गुन्हा दाखल झालेल्या महिलेचं नाव आहे.

वीजेचा वापर केल्यानंतर महावितरणाकडून देण्यात येणारे वीज बिल कमी करण्यासाठी अनेकजण वेगळी शक्कल लढवतात. मात्र, परभणी शहरातील सद्गुरु नगरमधील मंगला पारसकुमार जैन यांनी छेडछाड करुन मीटर बंद केले. सद्यस्थितीला महावितरणकडून ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मीटरची तपासणी केली असता मंगलान जैन यांनी मीटरमध्ये छेडछाड करून मीटर बंद केले असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांचे निर्दशनास आले.

‘मी ज्याच्यासाठी तुम्हाला सोडलं तो…’, प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीची आत्महत्या, सुसाईड नोट वाचून हादराल

मीटर बंद करून मंगला जैन यांनी दोन लाख दोनशे रुपयाचे वीजचोरी केली असल्याचे दिसून आले. याप्रकरणी महावितरणच्या परभणी शहर विभागाच्या सहाय्यक अभियंता रूपाली वसंतराव जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मंगला जैन यांच्या विरोधात नानलपेठ ठाण्यामध्ये विद्युत अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असल्याचे समजत आहे.

‘सरड्याला लाजवेल अशा भूमिका बदलणाऱ्यांनी…’; राष्ट्रवादीच्या आमदाराकडून राज ठाकरेंवर जहरी टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here