नवी दिल्लीः करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. या लॉकडाऊनला आज १५ दिवस झाले. पण करोना रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी ती वाढून ५ हजारांवर गेल्याने लॉकडाऊन वाढवण्यावर आता केंद्र सरकारमध्ये खल सुरू आहे. करोनाच्या रुग्णांची संख्या आज ५२७४ इतकी झाली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून संध्याकाळी देशातील करोना रुग्णांसंदर्भात माहिती देण्यात आली. ५२७४ रुग्णांपैकी ४७१४ रुग्णांवर सध्या देशात उपचार सुरू आहे. तर ४११ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. करोनाने मृतांची संख्या १४९ इतकी झाली आहे.

महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक १,०१८ रुग्ण आहेत. तामिळनाडूत ६९० आणि दिल्लीत ५७६ रुग्ण आहेत. तेलंगण, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, राजस्थान आणि अंदमान-निकोबारमध्ये करोनाचे रुग्ण आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध पक्षांच्या नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यात बहुतेक पक्षांनी म्हणजे ८० टक्के राजकीय पक्षांनी लॉकाडाऊन वाढवण्याच्या बाजूने आपलं मत व्यक्त केलं. यामुळे लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here